शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मैदानावर उतरण्याआधी 'या' गोष्टीला देते प्राधान्य; 3 सुवर्णपदक जिंकणाऱ्या एलानं सांगितलं धक्कादायक गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 1:42 PM

1 / 10
रशिया (Russia) ऑलिंपिक चॅम्पियन (Olympic champion) एला शिशकिना (Alla Anatolyevna Shishkina) जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, ती सेक्सला सुद्धा फिजिकल एक्सरसाइज असल्याचे समजते.
2 / 10
एलाने म्हटले आहे की, स्पोर्ट्सच्या मैदानावर आपला परफॉर्मेंस सुधारण्यासाठी सामन्यापूर्वीच्या सेक्सला प्राधान्य देते. एलाने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. एला सिन्क्रोनाइज्ड स्वीमिंगमध्ये भाग घेते.
3 / 10
यापूर्वी तिने २०१६ रिओ ऑलिंपिक आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. एलाने रशियन न्यूज आउटलेट स्पोर्ट्स एक्सप्रेसशी आपल्या ऑन फील्ड परफॉर्मेंसबाबत चर्चा केली.
4 / 10
मला विज्ञान, संशोधन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी माझे डॉक्टर डेनिस यांच्याशी याबद्दल बोलले, असे एलाने सांगितले. वैज्ञानिक समुदायाचा असा विश्वास आहे की, जर आपल्याला आपल्या व्यावसायिक खेळांमध्ये पूर्ण ताकदीने अल्पावधीत कामगिरी करायची असेल तर सेक्स यासंबंधी किफायतशीर असू शकते.
5 / 10
जर लांबचा प्रवास करावा लागला आणि परफॉर्मेंस फील्डवर जास्त चढ-उतार असतील, तर कदाचित मी सेक्सला प्राधान्य देणार नाही, असेही एला म्हणाली.
6 / 10
दरम्यान, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या शरीरानुसार निर्णय घेतला पाहिजे आणि जर तो आरामदायक असेल तर तो आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून अशा रूटीन्स फॉलो करू शकतात, असेही ती म्हणाली.
7 / 10
एला म्हणाली की, स्पर्धेपूर्वी सेक्स विथआउट आर्गेस्ममुळे स्नायूंची ताकद वाढू शकते. तसेच, कोणत्याही खेळाडूच्या स्पोर्ट्स एग्रेशनसाठी टेस्टोस्टेरॉन देखील उपयुक्त आहे. मॉस्कोमध्ये जन्मलेल्या एलाने यापूर्वीही स्पोर्ट्स, सेक्स आणि फिटनेसबाबत आपली मते शेअर केली आहेत.
8 / 10
दरम्यान, टीम इंडियाचे मेंटल हेल्थ कोच पॅट्रिक अँथनी अप्टन सुद्धा त्यांच्या एका पुस्तकामुळे चर्चेत आले होते. पॅट्रिक २००८-२०११ पर्यंत टीम इंडियाचे कोच होते. २०११ मध्ये जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांचा समावेश होता.
9 / 10
पॅट्रिक यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, सामन्यापूर्वी सेक्स कामगिरीत सुधारणा होण्यास मदत होते. त्यांनी २००९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नोट्स तयार केल्या होत्या. मात्र पॅट्रिक यांच्या पुस्तकाबद्दल बरेच वाद निर्माण झाले होते.
10 / 10
पॅट्रिक यांच्या सल्ल्यामुळे टीम इंडियाचे तत्कालीन कोच गॅरी क्रिस्टन संतापले. त्यानंतर पॅट्रिक यांनी गॅरी यांची माफी मागितली होती. मात्र, पॅट्रिक यांनी आउटलुक न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी कोणत्याही खेळाडूला या सल्ल्याचे पालन करण्यास कधीही सांगितले नव्हते. मी फक्त माहिती शेअर करत होतो.
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Swimmingपोहणे