ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. 7 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपली रेकॉर्डब्रेक कामगिरी कायम ठेवली असून अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात शतकी खेळी करत विराट कोहलीने संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने अंतिम सामना जिंकत मालिकाही जिंकली. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना आपलं 18 वं शतक पुर्ण केलं. यासोबतच विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डसोबत विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. आणखी वाचा - विराट शतक! भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकलीअर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बेयरस्टॉ जखमीपाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली जानेवारी महिन्यात धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून देणा-या सचिन तेंडुलकरच्या 14 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहलीने मोडला होता. कोहलीने यावेळी 11 धावांची खेळी केली. ही त्याच्या वनडे करिअरमधील 28 वं शतक होतं. तर अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी केलेलं हे पाचवं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरने आपल्या वनडे करिअरमध्ये धावांचा पाठलाग करताना एकूण 17 शतकं केली होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकांच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीने आता सनथ जयसुर्यांची बरोबरी केली आहे. आता तो फक्त रिकी पाँटिंग (31) आणि सचिन तेंडुलकरच्या (49) मागे आहे. सचिन तेंडूलकरने 232 सामन्यांमध्ये 17 शतकं केली होती, तिथे विराट कोहलीने फक्त 102 सामन्यांमध्ये 18 शतकं केली आहेत. धावांचा पाठलाग करताना शतक करण्याच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानचा तिसरा क्रमांक आहे. त्याने 116 सामन्यांमध्ये 11 शतकं केली आहेत.यासोबतच वेस्ट इंडिजविरोधात खेळताना त्यांच्याच मायभूमीवर दोन शतकं करणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी फक्त राहुल द्रविडने कर्णधार असताना वेस्ट इंडिजविरोधात शतक केलं होतं. वेस्ट इंडिजविरोधात शतक करणा-या खेळाडूंमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकलीनिर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा केला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या 205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.