शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tokyo Olympic, Sky Brown : Reality शो जिंकली, यू ट्यूबवरून स्केटबोर्डिंग शिकली अन् १३व्या ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 8:02 PM

1 / 10
Tokyo Olympic, Sky Brown : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बुधवारी ग्रेट ब्रिटनच्या स्काय ब्राऊन हिनं इतिहास घडवला. १३ वर्षे व २८ दिवसांच्या या चिमुकलीनं स्केटबोर्डिंगमध्ये कांस्यपदक जिंकले अन् ग्रेट ब्रिटनकडून ऑलिम्पिकपदक जिंकणारी ती सर्वात युवा खेळाडू ठरली. ( Sky Brown has made history in becoming Great Britain's youngest ever medallist). जपानमध्ये जन्मलेल्या स्कायचे आई- वडिल मिएको आणि स्टू हे ब्रिटिनचे आहेत.
2 / 10
विशेष म्हणजे तिला स्केटबोर्डिंग शिकवण्यासाठी कोणत्याच प्रशिक्षणाकडून मार्गदर्शन घेतलेलं नाही. यू ट्यूबवरून ती हे शिकली अन् आज इतिहास घडवला. तिच्या यशाची महती इथेच संपत नाही २०२०मध्ये तिनं डान्सिंग रिअॅलिटी शो जिंकला.
3 / 10
स्काय ही मियाझाकी येथे आई-वडिलांसोबत राहते आणि घराच्या मागच्या मोकळ्या जागेत ती स्केटबोर्डिंग करते. तिच्या शहरात स्केटबोर्ड पार्क नाही. तिचे वडील स्वतः स्केटबोर्डर होते, परंतु मुलीच्ये स्केटबोर्डिंगला त्यांचा विरोध होता. पण, ती मित्र मैत्रीणींसोबत चोरून स्केटबोर्डिंग करायची. वयाच्या ८व्या वर्षी तिनं व्यावसायिक स्पर्धेत सहभाग घेतला.
4 / 10
२०१७मध्ये तिनं आशियाई खंडीय अंतिम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. त्यावेळी ती फक्त १० वर्षांची होती आणि जगातील ती सर्वात युवा स्केटबोर्डर ठरली होती. त्यानंतर NIKE नं तिला स्पॉन्सरशीप दिली अन् तिथून तिनं मागे वळून पाहिले नाही. सोशल मीडियावरही तिचे एक कोटी फॉलोअर्स आहेत.
5 / 10
२०२०मध्ये तिच्या स्केटबोर्डिंगच्या स्वप्नं संपुष्टात आले होते. कॅलिफोर्निया येथी सराव करताना झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्याही संकटावर तिनं मात केले. तिथून तिनं ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी केली.
6 / 10
२०१८च्या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपदही तिनं नावावर केलं.
7 / 10
२०१८च्या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपदही तिनं नावावर केलं.
8 / 10
२०१८च्या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपदही तिनं नावावर केलं.
9 / 10
२०१८च्या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपदही तिनं नावावर केलं.
10 / 10
२०१८च्या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपदही तिनं नावावर केलं.
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Englandइंग्लंड