- आकाश नेवे/ऑनलाइन लोकमतरैनाच्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने अखेरीस विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सुनील नारायणची ४२ धावांची तुफानी खेळी. सुनील नारायणला सलामीला पाठवण्याचा केकेआरचा निर्र्णय दुसऱ्यांदा यशस्वी ठरला. या आधीही तो किंग्ज इलेव्हन विरोधात खेळताना सुनीलने सलामीला येऊन १८ चेंडूत ३७ धावा काढल्या होत्या.वेस्ट इंडिज्च्या सुनील नारायणकडे केकेआरने आतापर्यंत फक्त फिरकीपटू म्हणून पाहिले होते. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर केकेआरला आतापर्यंत अनेक सामने जिंकून दिले आहे. मात्र या आयपीएलमध्ये केकेआरने नव्याने प्रयोग सुरू केला. तो म्हणजे पार्ट-टाईम ओपनर पाठवण्याचा. आधी ख्रीस लीन आणि आता सुनील नारायण हे या प्रयोगातले शिलेदार ठरले. या सामन्यात सुनीलच्या तुफानी खेळीने केकेआरला एक उत्तम सुरुवात करून दिली. सुनीलने या सामन्यात २४७ च्या स्ट्राईकरेटने धावा काढल्या. या खेळीत त्याने एक अनोखा विक्रम केला. ९ चौकार आणि एक षटकार ठोकत ४२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने एकेरी किंवा दुहेरी धावा काढल्याच नाही. अशीच खेळी २००८ मध्ये डेक्कन चार्जसकडून सनथ जयसूर्या याने केली होती. जयसूर्याने त्या वेळी ३६ धावा काढल्या होत्या.गुजरातने हा सामना जिंकताना १८८ या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. केकेआरला त्यांच्या होमग्राउंडवर पराभूत करताना २०१० च्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी साधली. मुंबईनेही केकेआरला पराभूत करताना १८८ या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती गुजरात लायन्सने केली.गुजरातच्या डावाची सुरुवातही धमाकेदार होती. अॅरॉन फिंचला गवसलेला सूर ही गुजरातसाठी आनंदाची बाब आहे. फिंचने चौकार आणि षटकार ठोकत शाकीब आणि सुनीलच्या गोलंदाजीची पिसे काढली. मॅकक्युलमनेही नेहमीच्या अंदाजात आकर्षक फटके मारले. मात्र ठरावीक अंतराने हे दोन्ही फलंदाज बाद झाले.त्यानंतर आलेले कार्तिक आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले.पाचव्या षटकांत रैनाला या सामन्यात दोन वेळा जीवदान मिळाले. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर त्याचा झेल उथप्पाने सोडला. तर पुन्हा एकदा नवव्या षटकात व्होक्सच्या चेंडूवर पठाणला झेल घेता आला नाही. या जीवदानाचा पुरेपूर लाभ रैनाने घेतला. त्याला कुलदीप यादवने बाद केले. मात्र तोपर्यंत केकेआरचा विजय ही फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली होती. जाडेजाने चौकार लगावत विजय मिळवून दिला. १७ चेंडूत ४२ धावा करणारा सुनील नारायणच केकेआरचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. जेवढ्या धावा त्याने केल्या, तेवढ्याच धावा त्याने दिल्यादेखील. त्याने ४ षटकांत ४२ धावा दिल्या.ब्रेंडन मॅकक्युलम याने ३३ धावा केल्या. याच जोरावर त्याने आॅरेंज कॅपच्या शर्यतीत मुंबईचा स्टार नितीश राणाला मागे टाकले. मॅकक्युलमने आतापर्यंत आयपीएल १० मध्ये २५८ धावा केल्या आहेत.पर्पल कॅप सध्या सनरायजर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारकडेच आहे. त्याने सहा सामन्यात १५ गडी बाद केले आहेत.