शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'सानिया' सध्या काय करते? लेकासोबत मस्ती अन् बरंच काही; फोटो शेअर दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 4:51 PM

1 / 10
भारताची स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झा फावल्या वेळात आपल्या मुलासोबत वेळ घालवते. ती सातत्याने सोशल मीडियावर याची झलक पोस्ट करत असते.
2 / 10
कधी दुबई तर कधी जगातील इतर नामांकित शहरांना ती भेट देत असते. आता तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये सानियाची भटकंती, मुलगा इझहान आणि इतर बऱ्याच बाबींचा उल्लेख आहे.
3 / 10
तिने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, फ्लाइट्स, लॉलीपॉप, शूट, कार्यक्रम, पाणी पुरी, लुडो, कुटुंब, मित्र आणि बरेच काही.
4 / 10
सानिया आणि शोएब मलिक हे वेगळे झाले आहेत. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे.
5 / 10
२०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या.
6 / 10
एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
7 / 10
दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते.
8 / 10
शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडले होते.
9 / 10
१२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते.
10 / 10
लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे.
टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिस