There is no wrestling in friendship, but there will be friendship in wrestling ...
महाराष्ट्र केसरी स्पेशल : दोस्तीत कुस्ती नाही, पण कुस्तीत दोस्ती असणारच... By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 7:40 PM1 / 11महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत चांगलीच अटीतटीची झाली. कारण या सामन्यात पहिला गुण शैलेश शेळकेने पटकावला होता. 2 / 11त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने एक गुण मिळवत बरोबरी केली होती. 3 / 11सामन्याला एक मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन सदगीर १-२ अशा पिछाडीवर होता. 4 / 11पण अखेरच्या 20 सेकंदात हर्षवर्धनने खेळ पालटविला, हर्षवर्धनने तिहेरी पट काढून 2 गुण घेतले आणि बाजी मारली.5 / 11हर्षवर्धनने अंतिम लढतीचा सामना ३-२ असा जिंकत जेतेपद पटकावले.6 / 11पण हा सामना जिंकल्यावर हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर उचलून घेतल्याचे पाहायला मिळाले.7 / 11जेव्हा हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर उचलले तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला.8 / 11काहींना तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.9 / 11पण हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर घेत मैदानाची एक फेरी मारली.10 / 11ही सर्व गोष्ट आश्चर्याचा धक्का बसणारी होती. पण त्यानंतर हर्षवर्धनला याबाबत विचारण्यात आले.11 / 11याबाबत हर्षवर्धन म्हणाला की, शैलेश हा माझा जीवलग मित्र आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीत कुस्ती होणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications