शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tokyo Olympics: टीम इंडियाचा कर्णधार मनप्रीत सिंग पत्नीला गिफ्ट करणार रेंज रोव्हर; मलेशियन मुलीशी केलंय लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 8:08 PM

1 / 13
Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी करताना जर्मनीवर विजय मिळवून कांस्यपदकाची कमाई केली. १९८०नंतर ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.
2 / 13
भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कुटुंबातील प्रत्येकी व्यक्ती खेळाडू घरी कधी येतील याची प्रतीक्षा पाहत आहेत.
3 / 13
भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यानं ऑलिम्पिक पदक जिंकून पत्नी इली हिला दिलेलं वचन पूर्ण केलं. आता तो पत्नीला रेंज रोव्हर्स कार गिफ्ट करणार आहे.
4 / 13
पंजाबच्या जालंधर येथील मिथापूर गावात शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या मनप्रीतनं १६ डिसेंबर २०२०त मलेशियाच्या इली नाजवा सिद्धीकी हिच्याशी लग्न केलं.
5 / 13
२०१३मध्ये सुल्तान ऑफ जोहोर चषक स्पर्धेत भारतानं सुवर्णपदक जिंकेल आणि त्यावेळी या दोघांची भेट झाली होती. तेव्हा मनप्रीत ज्युनियर संघाचा कर्णधार होता.
6 / 13
मनप्रीतचा आई मनजीत कौर हे मुलाची आतुरतेनं वाट पाहत आहे. त्यांनी व्हिडीओ कॉलवरून मुलासोबत बोलली आणि आता त्यांचे डोळे मुलाच्या मायदेशात येण्याकडे लागले आहेत. मेडलसह त्यांना मुलाला मिठी मारायची आहे. मनप्रीतसाठी त्या आलू के पराठे बनवणार आहेत आणि स्वतःच्या हातानं ते त्याला भरवणार आहेत.
7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13
हार्दिक सिंग आपल्या गाडीवर ऑलिम्पिक लोगो लावून फिरणार आहे. टोकियोला जाताना हार्दिकनं त्याच्या लहान भावाला पदक जिंकल्यानंतर गाडीवर ऑलिम्पिक लावण्याचे वचन दिले होते. हार्दिकची आई कमलजीत कौर यांनी मुलासाठी सोन्याची चैन बनवली आहे.
11 / 13
भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली.
12 / 13
भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी बक्षीस देण्याचे पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंग सोढी यांनी जाहीर केले.
13 / 13
कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह पंजाबचे आठ खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये हरमनप्रीत सिंग, रुपिंदरपाल सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे. भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला, तेव्हा जर संघानं सुवर्णपदक जिंकल्यास पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी देण्याचे जाहीर केले होते.
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Hockeyहॉकी