शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vinesh Phogat : "अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:03 AM

1 / 13
कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विनेशचे वजन कमी करण्यासाठी किती प्रयत्न केले आणि त्यानंतरही तिचं वजन १०० ग्रॅमने कमी झालं नाही हे सविस्तर सांगितलं आहे.
2 / 13
डॉ. दिनशॉ पारदीवाला य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गोल्ड मेडलसाठी होणाऱ्या सामन्याआधी विनेश फोगटचं वजन हे दोन किलोने वाढलं होतं. ते कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आली. मात्र, खूप मेहनत करूनही अतिरिक्त १०० ग्रॅम वजन कमी करता आलं नाही.'
3 / 13
'विनेश फोगटच्या न्यूट्रिशनिस्टला पूर्ण आशा होती की, तिचं अतिरिक्त वजन एका साध्या प्रक्रियेद्वारे कमी केलं जाऊ शकतं. परंतु तीन कठोर प्रयत्नांनंतरही ही प्रक्रिया प्रभावी ठरली नाही. कधीकधी स्पर्धेनंतर वजन वाढू शकतं.'
4 / 13
'विनेशचे तीन सामने होते. त्यामुळे डिहाइड्रेशन टाळण्यासाठी तिला काही प्रमाणात पाणी द्यावं लागलं. स्पर्धेनंतर तिचं वजन सामान्य वजनापेक्षा जास्त वाढल्याचं आम्हाला समजलं.'
5 / 13
'कोचने वजन कमी करण्याची नेहमीची प्रक्रिया सुरू केली, जी नेहमी विनेशसोबत करत असे. त्यामुळे विनेशचे वजन कमी होण्यास मदत होईल, असा त्यांचा विश्वास होता. वजन कमी करण्याची प्रक्रिया रात्रभर अवलंबली गेली.'
6 / 13
'सकाळी सर्व प्रयत्न करूनही विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आलं. केस कापण्यासह आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र त्यानंतरही आम्ही ५० किलो वजनी गटात पोहोचू शकलो नाही.'
7 / 13
'जर विनेशचं वजन करण्याआधी थोडा आणखी वेळ असता तर ती वजन कमी करण्यात यशस्वी झाली असती. सेमा फायनलच्या सामन्यानंतर विनेशचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा २.७ किलो जास्त होतं, जे कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होतं.'
8 / 13
'सर्व प्रयत्नांनंतर १२ तासांच्या वेळेमुळे आम्ही शेवटचं १०० ग्रॅम कमी करण्यात असमर्थ ठरलो. शेवटी वजन मोजल्यावर लक्षात आलं की ते आवश्यक मर्यादेपेक्षा थोडं जास्त आहे. तिला काही अतिरिक्त तास मिळाले असते तर विनेशचे वजन कमी झालं असतं, पण यामुळे ती अपात्र ठरली.'
9 / 13
'सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्याचं वजन कमी होतं, तेव्हा ते डिहायड्रेशनमुळे होतं. पण जेव्हा तुम्ही पाणी पितात तेव्हा तुमचं वजन वाढतं आणि सामन्यांदरम्यान काही प्रमाणात पाणी पिण्याची गरज असते. वजन ७.१५ ते ७.३० पर्यंत मोजलं जातं.'
10 / 13
'आम्ही शेवटी ७.२९ ला वजन केलं. विनेशचं वजन आवश्यक मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त होतं. कदाचित आमच्याकडे आणखी काही तास असते तर आम्ही ते १०० ग्रॅम कमी करू शकलो असतो, परंतु आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता.'
11 / 13
'वजन कमी केल्याने अशक्तपणा येतो आणि ऊर्जा कमी होते. म्हणून, बहुतेक कुस्तीपटू काही प्रमाणात ऊर्जा पुनर्संचयित करण्यासाठी मर्यादित पाणी आणि हाय एनर्जीवाले पदार्थ खातात. पण हे सहसा वजन केल्यानंतर दिलं जातं. न्यूट्रिशनिस्ट ऍथलीटनुसार त्याची गणना करतात.'
12 / 13
'विनेशच्या न्यूट्रिशनिस्टला असा विश्वास होता की, तिला १.५ किलो न्यूट्रिशन देणं योग्य आहे, जे तिच्या शरीराला दिवसभराच्या स्पर्धांसाठी ऊर्जा देतं' असं डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी म्हटलं आहे.
13 / 13
'विनेशच्या न्यूट्रिशनिस्टला असा विश्वास होता की, तिला १.५ किलो न्यूट्रिशन देणं योग्य आहे, जे तिच्या शरीराला दिवसभराच्या स्पर्धांसाठी ऊर्जा देतं' असं डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४doctorडॉक्टर