शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 12:55 PM

1 / 7
भारताला आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळण्याची अपेक्षा होती. विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू फायनलच्या दिवशीच विनेश फोगाटला वजन जास्त भरल्याने अपात्र घोषित करण्यात आले आहे.
2 / 7
विनेश ही यापूर्वी ५३ किलो वजनी गटातून खेळत होती. परंतू तिने ऑलिम्पिकसाठी आपले वजन कमी केले होते व ५० किलो वजनी गटातून तिने फायनलपर्यंत धडक मारली होती. फायनलपूर्वी विनेशचे वजन मोजण्यात आले, ते १०० ग्रॅम जास्त भरले, यामुळे ऑलिम्पिकच्या नियमाप्रमाणे विनेशला अपात्र घोषित करण्यात आले.
3 / 7
अपात्र ठरल्याने तिला फायनल खेळता येणार नाही. तसेच कोणतेही मेडल मिळणार नाही. विनेशने मंगळवारी तीन सामने खेळले होते. क्युबाच्या गुजमान लोपेजीला 5-0 ने हरविले होते. तिचा पहिला सामना जपानच्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट युई सुसाकी सोबत झाला होता. विनेशने तिला 3-2 अशी धूळ चारली होती. यामुळे भारताला गोल्ड मेडल पक्के असल्याचे मानले जात होते.
4 / 7
ऑलिम्पिकसाठी कुस्तीमध्ये फक्त दोन पदके असतात. गोल्ड आणि ब्राँझ मेडल दिले जाते. यामुळे विनेशला सिल्व्हर मेडलही दिले जाणार नाहीय. विनेशला आज रात्री १० वाजता अमेरिकेच्या सारा एन हिल्डरब्रांटशी दोन हात करायचे होते. नियमानुसार विनेशला शेवटच्या स्थानावर ठेवले जाणार आहे.
5 / 7
विनेशला आणि तिच्या प्रशिक्षकांना तिचे वजन ५० किलोपेक्षा जास्त झाल्याचे रात्रीच समजले होते. यामुळे रात्रभर त्यांनाी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले.
6 / 7
यामध्ये जॉगिंग, स्किपिंग आणि सायकलिंगही विनेशला करायला लागले होते. परंतू काही केल्या वजन कमी झाले नाही. मंगळवारी सकाळी तिचे वजन ५० किलोच्या आत भरले होते.
7 / 7
भारताने विनेशला आणखी काही वेळ संधी द्यावी अशी मागणी ऑलिम्पिककडे केली होती. परंतू, ही मागणी मान्य करण्यात आली नाही, असे सुत्रांनी सांगितले.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती