शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Neeraj Chopra Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे नवा भाला घ्यायला नव्हते पैसे, नीरज चोप्राने 'अशी' केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 2:49 PM

1 / 7
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने रौप्यपदकाची कमाई केली. पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताचा नीरज चोप्रा अशी सुवर्णपदकासाठी थेट लढत गुरुवारी रात्री रंगली. त्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले.
2 / 7
नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ९०.४५ मीटर लांब भालाफेक केली. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब अंतरावर भाला फेकत ऑलिम्पिक रेकॉर्ड सेट केला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. अर्शद नदीमच्या या यशात अप्रत्यक्षपणे नीरजचा छोटासा वाटा आहे.
3 / 7
मार्च महिन्यात अर्शद नदीमने मीडियाशी बोलताना माहिती दिली होती की, माझा जॅव्हेलिन आता जीर्ण झाला आहे. राष्ट्रीय महासंघ आणि माझे प्रशिक्षक यांना मी कळवले आहे की पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. सुमारे २०१५ पासून मी हाच भाला वापरत असल्याने आता त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
4 / 7
पुढे तो म्हणाला होता की, एखाद्या ऑलिम्पिक स्पर्धेत अशा भाल्याने खेळणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्या दर्जाची साधने असणे आवश्यक आहे. पण माझ्याकडे तितके पैसे नाहीत,' असे मार्च महिन्यात अर्शद बोलला होता. अर्शदला भाला घेण्यासाठी सुमारे ८५ हजार रुपयांची गरज होती.
5 / 7
अर्शद नदीमकडे भाला घेण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही हे जेव्हा मीडियाच्या माध्यमातून नीरजला समजले तेव्हा त्याला खूपच चिंता वाटली. तो म्हणाला होता की, नवा भाला विकत घेण्यासाठी अर्शदला ठिकठिकाणी जाऊन उंबरठे झिजवावे लागत आहेत ही बाब वाईट आहे.
6 / 7
नदीमची प्रतिभा पाहता राष्ट्रीय महासंघ आणि स्पॉन्सर्सने नक्कीच त्याला मदत केली पाहिजे. माझं असं अपील आहे की अर्शद हा खूपच उत्तम खेळाडू आहे. त्याला जी हवी ती मदत संबंधितांनी नक्की करावी. तो नक्कीच उत्तम कामगिरी करेल,' असे नीरजने त्यावेळी स्पॉन्सर्सना आवाहन केले होते.
7 / 7
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मदतीला धावले... नीरजने केलेले आवाहन पाकिस्तान क्रिकेट बोर्डापर्यंत पोहोचले. आपल्या देशाच्या खेळाडूबाबत स्पर्धक देशही बोलू लागले आहेत याची जाणीव होताच, PCBने अर्शद नदीमला भाला घेण्यासाठी आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्व गरजेच्या सोयीसुविधांसाठी स्पॉन्सरशिप दिली. त्यामुळेच यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तो सर्वोत्तम कामगिरी करू शकला आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारतPakistanपाकिस्तान