Who is Sarabjot Singh who won bronze medal in Paris Olympics 2024 along with Manu Bhaker
Sarabjot Singh Manu Bhaker, Paris Olympics 2024: भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा मनू भाकरचा साथीदार सरबजोत सिंग कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:33 PM1 / 8पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्यपदकाच्या लढतीत सरबज्योत सिंग-मनू भाकर जोडीने कांस्यपदक पटकावले. नेमबाजीत यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक ठरले.2 / 8दोन दिवसांपूर्वी मनू भाकरने वैयक्तिक क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आज मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर सोबत सरबज्योत सिंगने पदक जिंकले. जाणून घेऊया, पदक जिंकणारा सरबज्योत सिंग कोण आहे?3 / 8सरबजोत सिंग पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आणि त्याने पदकाची कमाई करून भारतीयांना खुशखबर दिली. सरबजोतचा जन्म ३० सप्टेंबर २००१ रोजी अंबाला येथे झाला. त्याने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली.4 / 8सरबजीतने उन्हाळी शिबिरात काही मुलांना एअर गन शूट करताना पाहिले होते. त्यातून प्रेरणा घेत त्याने हा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याचा शूटिंगमधील प्रवास सुरू झाला. सरबजोतने २०२३मध्ये पंजाब विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली.5 / 8अंबाला येथील एआर अकादमी ऑफ शूटिंग स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षण सुरू केले. सरबजोतने अनुभवी नेमबाज समरेश जंग यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण घेतले आहे. अभिषेक राणा हे त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत.6 / 8सरबजीत त्याचे वडील जितेंद्र यांना आपले आदर्श मानतो. आपल्या यशाचे श्रेय तो त्याचा मित्र आदित्य मलरा याला देतो. सरबजोत म्हणतो की, आदित्य या प्रवासात पहिल्या दिवसापासून त्याच्यासोबत आहे आणि त्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सरबजोतला प्रेरणा दिली.7 / 8सरबजोतने कोरियात २०२३मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकली होती. १० मीटर एअर पिस्टल मिश्र स्पर्धेत रौप्य तर १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. यामुळेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो भारतासाठी कोटा मिळवण्यात यशस्वी ठरला होता.8 / 8सरबजोतने गेल्यावर्षीच्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारात सुवर्ण, १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. नंतर भोपाळमधील विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारातही सुवर्ण जिंकले. आणखी वाचा Subscribe to Notifications