शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 3:05 PM

1 / 7
अमेरिकेची खेळाडू सोफिया सीव्हिंग हिने नुकत्याच झालेल्या PWR DUPR India Masters Pickleball Championship स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला.
2 / 7
तृतीय मानांकित खेळाडू असूनही सीव्हिंगने अंतिम फेरीत अव्वल मानांकित काओ पै चुआन हिचा ११-३, ११-२ अशा सरळ गेममध्ये पराभव केला.
3 / 7
सोफिया सीव्हिंगचा जन्म २२ जुलै १९९९ रोजी मियामीमध्ये झाला. ती आधी एक व्यावसायिक टेनिस खेळाडू होती. तिने आतापर्यंत सुमारे $ ७६,००० पेक्षा जास्त बक्षीस रक्कम जिंकली आहे.
4 / 7
सोफियाने टेनिस खेळताना ITF ज्युनियर रँकिंगमध्ये टॉप10 मध्ये प्रवेश केला होता. तिने महिला एकेरी प्रकारात WTA क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४५५वे स्थान गाठले होते.
5 / 7
सोफिया २०२२ मध्ये WTA चॅलेंज टूरच्या अंतिम फेरीत पोहोचली. तिने टेनिस खेळताना महिला एकेरीची ४ आणि दुहेरीची १४ विजेतेपदे जिंकली आहेत.
6 / 7
सध्या ती पिकलबॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. PWR DUPR India Masters Pickleball हे तिचे पहिले विजेतेपद जिंकले.
7 / 7
सर्व फोटो सौजन्य- सोफिया सीव्हिंग इन्स्टाग्राम
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिकाViral Photosव्हायरल फोटोज्