1 / 9देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मोठा गाजावाज करत नवीन संसदेच्या सोहळ्याची चर्चा देशभर सुरू झाली.2 / 9तर, दुसरीकडे जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता, आंदोलक पैलवानांची धरपकड होत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.3 / 9नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर पैलवांनाच्या आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. 4 / 9नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. 5 / 9 त्यावेळी, पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसून येते. 6 / 9राजधानी दिल्लीतील या घटनेवरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. देशासाठी मेडल जिंकणाऱ्या या कुस्तीपटूंचं कधीकाळी सर्वांनीच कौतुक केलं होतं, त्यांचा अभिमान बाळगला होता. 7 / 9आता, या कुस्तीपटूंचा हा अवमान आणि त्यांच्यावर होत असलेली ही कारवाई अवमानजनक असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेलिब्रिटींनीही यावर मत व्यक्त केलंय. 8 / 9काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलाय. तर, स्वरा भास्कराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. 9 / 9सोशल मीडियात सध्या दिल्लीतील या घटनेचे फोटो व्हायरल होत असून कुस्तीपटू ट्रेंड करत आहेत. दरम्यान, विनेश फोगाटने नया भारत म्हणत घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय.