Godavari, Purna rivers flooded due to incessant rains; 12 doors of Dudhna project opened
संततधार पावसाने गोदावरी, पूर्णा नद्या तुडूंब; दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडले By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 2:29 PM1 / 7परभणी जिल्ह्या व परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी व पूर्णा या नद्या तुडुंब वाहत आहेत. 2 / 7पूर्णा-ताडकळस रस्त्यावर पिंगळगड नदीला पूर आल्याने हा मार्ग गुरुवार पहाटेपासून बंद झाला आहे. 3 / 7चार दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. रविवारपासून कधी जास्त तर कधी सौम्य स्वरूपात संततधार पाऊस सुरूच आहे. 4 / 7हा पाऊस सर्वदुर असल्याने हिंगोली जिल्ह्यातील औंढा-वसमत येथील तर परभणी जिल्ह्यातील पावसाचे पाणी तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना, पिंगळगड या नद्यांना आले आहे आहे. 5 / 7पूर्णा नदीचे पाणी कंठेश्वर येथे गोदावरी नदी पात्रात विसर्जित होत असल्याने सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.6 / 7सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात बुधवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. 7 / 7यामुळे प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडून नदीपाञात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications