The Alliance accepted the 'political party' and rejected the 'political party'
युती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 4:23 PM1 / 8आदिती तटकरे, राष्ट्रवादी- विजयी; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या. येथील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अवधूत तटकरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आदिती यांनी प्रथमच निवडणूक लढवित श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळविला.2 / 8देवयानी फरांदे, भाजपा- विजयी; विधान परिषदेचे माजी सभापती ना. सं. फरांदे यांच्या स्नुषा. नाशिक मध्य मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.3 / 8वर्षा गायकवाड, काँग्रेस- विजयी; काँग्रेसचे खासदार एकनाथराव गायकवाड यांची कन्या. मुंबईमधील धारावी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.4 / 8प्रणिती शिंदे, काँग्रेस- विजयी; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या. सोलापूर मध्यमधून दुस-यांदा विजयी. येथे सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.5 / 8पंकजा मुंडे, भाजप- पराभूत; भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या. घरच्याच म्हणजे परळी मतदारसंघामध्ये त्यांना चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. प्रचारादरम्यान या भावा-बहिणीमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या.6 / 8निर्मला गावित, शिवसेना- पराभूत; माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या. काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवबंधन बांधले होते. इगतपुरी मतदारसंघातून ‘त्या’ पराभूत झाल्या.7 / 8रोहिणी खडसे; भाजप- पराभूत; माजी मंत्री भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या जळगावमधल्या मुक्ताईनगरमधून पराभूत झाल्या. खडसे यांची उमेदवारी कापल्यानंतर भाजपने त्यांच्या कन्येला निवडणुकीमध्ये उतरविले होते.8 / 8स्नेहलता कोल्हे, भाजप- पराभूत; माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा. नगर जिल्ह्यातील कोपरगाव काळे-कोल्हे या दोन गटांमधील शह-काटशह पुढच्या पिढीतही सुरूच असलेले दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications