cm uddhav thackeray meets sanjay rathod for 2 minutes after keeping him for long wait
मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला?; वर्षावर भेटीसाठी आलेल्या संजय राठोडांना दिले स्पष्ट संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 10:17 AM1 / 10पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पूजाचे समोर आलेले नवे फोटो, ऑडिओ क्लिप यांच्यामुळे राठोड यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.2 / 10वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कृतीतून राठोड यांना स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जात आहे.3 / 10मुख्यमंत्री ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते.4 / 10मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी आलेल्या राठोड यांना दीड तास ताटकळत ठेवलं. यानंतरही मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना केवळ २ मिनिटांचा वेळ दिला. अवघी २ मिनिटं बोलून मुख्यमंत्री तिथून निघून गेले.5 / 10संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. 6 / 10यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. 7 / 10शिवसेना नेतृत्वानं संजय राठोड यांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राठोड यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरेंकडून कारवाई केली जाऊ शकते.8 / 10राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांच्या माध्यमातून राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केलं.9 / 10माझा समाज माझ्या सोबत असल्याचा सूचक संदेश राठोड यांनी शक्तिप्रदर्शनातून दिला. ही बाब शिवसेना नेतृत्त्वाला रुचलेली नाही. त्यामुळेच राठोड यांच्यापासून पक्षानं दोन हात लांब राहून फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यास सुरुवात केली आहे.10 / 10शिवसेना संजय राठोड यांच्यापासून अंतर राखत असल्याचं काल नागपुरात दिसून आलं. मुंबई गाठण्यासाठी राठोड यवतमाळमधून नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी तिथे एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. संजय राठोड नागपूरचे संपर्कमंत्री असूनही त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एकही शिवसैनिक उपस्थित नसणं ही बाब लक्षणीय मानली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications