congress leader sachin pilot and sara abdullah love story
धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 5:14 PM1 / 6काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नावावर सर्वात कमी वयात खासदार होण्याचा विक्रम आहे. राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या सचिन पायलट यांना प्रेमासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. 2 / 6सचिन पायलट एमबीए पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले होते. तिथे त्यांची भेट जम्मू काश्मीर आणि दिल्लीच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेल्या फारुक अब्दुल्ला यांची कन्या सारा अब्दुल्ला यांच्याशी झाली. या दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.3 / 6शिक्षण पूर्ण झाल्यावर सचिन पायलट मायदेशी परतले. मध्यंतरीच्या काळात सारा यांनी सचिन आणि त्यांच्या नात्याची कल्पना आईला दिली होती. मात्र त्यांनी या नात्याला विरोध केला. सचिन भारतात परतल्यावर नात्यातला दुरावा वाढला आणि प्रेमाची अग्निपरीक्षा सुरू झाली.4 / 6सचिन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन कुटुंबाची समजूत घातली. मात्र अब्दुल्ला कुटुंबाचा विरोधा काही केल्या मावळत नव्हता. सारा त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. या नात्याची कुजबूज हळूहळू सर्वत्र होऊ लागली. याचे राजकीय परिणाम अब्दुल्ला कुटुंबाला सहन करावे लागले. त्यामुळे फारुख अब्दुल्ला यांचा विरोध आणखी तीव्र झाला.5 / 6मैत्री ते प्रेम हा टप्पा सचिन आणि सारा यांच्यासाठी सोपा होता. मात्र प्रेम ते लग्न हा टप्पा त्यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक होता. या काळात या दोघांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली. सचिनसोबतच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळावी, यासाठी सारा यांनी खूप प्रयत्न केले. मात्र अब्दुल्ला कुटुंबानं हे नातं स्वीकारलं नाही. 6 / 6अखेर जानेवारी 2004 मध्ये सारा आणि सचिन विवाह बंधनात अडकले. यानंतर अब्दुल्ला कुटुंबानं सारासोबतचे संबंध तोडले. या लग्नाला कुटुंबातील एकही व्यक्ती आली नाही. मात्र लग्नानंतर पायलट यांच्या कुटुंबानं सारा यांना कधीही याची उणीव जाणवू दिली नाही. अखेर काही वर्षानंतर अब्दुल्ला कुटुंबानं या नात्याला मान्यता दिली अन् ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications