शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिग्गजांसाठी दिल्ली दूरच...

By admin | Published: February 10, 2015 12:00 AM

1 / 7
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणा-या किरण वालीया यांचादेखील निवडणुकीत पराभव झाला. वालीया या थेट तिस-या स्थानावर फेकल्या गेल्या असून त्यांना अवघी ४७८१ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल हे ५७ २१३ मतं मिळवून विजयी झाले आहेत.
2 / 7
काँग्रेस उमेदवार व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झाल्या. शर्मिष्ठा यांना फक्त ६.१०२ मतं मिळाली आहेत.
3 / 7
काँग्रेसचे दिल्लीतील प्रचार प्रमुख अजय माकन हे सदरबाजार मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांना १६ ३३१ मतं मिळाली असून या पराभवानंतर अजय माकन यांनी काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.
4 / 7
काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांनाही दिल्लीतील मतदारांनी नाकारले. तीरथ यांना आपच्या उमेदवाराकडून तब्बल ३४ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
5 / 7
आपमधून भाजपामध्ये आलेले विनोदकुमार बिन्नी यांचा पतपडगंज मतदारसंघातून आपचे उमेदवार मनीष सिसोदीया यांनी पराभव केला. बिन्नी १९ हजार मतांनी पराभूत झाले.
6 / 7
भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते व किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळाल्याने काहीसे नाराज असलेले प्रा. जगदीश मुखी यांचा जनकपुरी मतदारसंघात आपच्या उमेदवाराने पराभव केला. मुखी हे सलग पाच वेळा आमदार झाले असून यंदा षटकार ठोकत दिमाखात विधानसभेत प्रवेश करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.
7 / 7
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणा-या व थेट मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळवणा-या किरण बेदींना दिल्लीकरांनी साथ दिली नाही. कृष्णानगर मतदारसंघात आपचे एसके बग्गा यांनी बेदींचा दोन हजार मतांनी पराभव केला.