1 / 4प्रियदर्शनी सिंधिया: बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील प्रियदर्शनी यांचा विवाह 1994 मध्ये काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी झाला. अतिशय मोठ्या घराण्याची सून होऊनही त्यांचं राहणीमान अतिशय साधं आहे. महिला आणि बालकल्याण क्षेत्रात त्या काम करतात. 2 / 4डिंपल यादव: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी असलेल्या डिंपल यादव राजकारणात सक्रीय आहेत. डिंपल यांचे वडिल लष्करातून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झाले. 1999 मध्ये अखिलेश आणि डिंपल यांचा विवाह झाला. 3 / 4सारा अब्दुल्ला-पायलट: काँग्रेस नेते सचिन पायलट 2004 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांची पत्नी सारा अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची कन्या आहे. धार्मिक कारणांमुळे या लग्नाला मोठा विरोध सहन करावा लागला होता. मात्र हे दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. 4 / 4राजलक्ष्मी यादव: लालू प्रसाद यांची कन्या राजलक्ष्मी यांची कन्या 2015 मध्ये विवाहबद्ध झाली. तिचा विवाह मुलायम सिंह यांच्या कुटुंबातील तेज प्रताप सिंह यांच्याशी झाला. दोन मोठ्या राजकीय कुटुंबात सोयरिक जुळवणाऱ्या या सोहळ्याला देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.