Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 1:34 AM
1 / 16 राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आघाड्यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी आमदार-खासदारांपैकी काही लोकप्रतिनिधींना आपापली गावे राखली. मात्र, काही गावांत मतदारांनी नेत्यांना जबरदस्त आणि अनपेक्षित धक्केही दिले आहे. 2 / 16 भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. 3 / 16 अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. 4 / 16 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी या गावात ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. 5 / 16 सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांच्या पॅनलचा पराभव केला. 6 / 16 म्हैसाळ (ता. मिरज) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांचे सख्खे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची सत्ता उलथवत चुलत मेहुणे भाजपचे दीपक शिंदे यांनी बाजी मारली. 7 / 16 सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतीवर खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला 8 / 16 विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृहतालुका असलेल्या साकोलीत भाजपने मोठी मुसंडी मारली असून १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले. 9 / 16 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या तालुक्यातील प्रभावक्षेत्रात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. 10 / 16 लोणी खुर्दमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. 11 / 16 सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायतीवर माजी मंत्री मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे. 12 / 16 सोलापूर जिल्ह्यात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोरदार धक्का बसला. 13 / 16 अमित देशमुख यांच्या बाभळगावात देशमुख यांच्या पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. 14 / 16 कोराडी ग्रामपंचायत राखण्यात भाजपचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले. 15 / 16 महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथे त्यांच्या नेतृत्वातील पॅनेलने १३ पैकी ७ जागा जिंकल्या. 16 / 16 गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यात तीनपैकी एका ग्रा. पं. मध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आणखी वाचा