इन्कम टॅक्स ऑफिसर ते दिल्लीचे मुख्यमंत्री, असा आहे अरविंद केजरीवाल यांचा हा थक्क करणारा प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:29 IST
1 / 18संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्ष (आप) याना सत्तेवर बसण्याचा कौल दिला आहे. आम आदमी पक्ष (आप) पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाला आहे. 2 / 18 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी ही निवडणूक लढवली गेली. त्यात दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील3 / 18या निकालाबरोबरच अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची हॅट्रीक साधणार आहेत. राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसाचा आवाज खऱ्या अर्थाने बुलंद करणारा एक कार्यकर्त्याच्या रूपातून उदयास आलेले केजरीवाल यांच्याकडे आपचे कार्यकर्ते आता थेट पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पाहत आहेत.4 / 18आपचा प्रमुख चेहरा असणारे अरविंद केजरीवाल यांची विविध रूपे गतकाळात देशाने अनुभवली आहेत अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनातील अँग्री यंग मॅन, निवडणुकीच्या राजकारणातील प्रवेश, २०१३ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये मोठा विजय5 / 18 अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या सत्तेचा त्याग करणे आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर दोलायमान अवस्थेत सापडूनही पुन्हा एकदा घेतलेली उभारी, पाच वर्षे दिल्लीचा कारभार पाहणे, अनेकदा केंद्र सरकारशी आणि नायाब राज्यपालांशी उडालेले खटके असे अनेक नाट्यमय चढ-उतार केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या कारकीर्दीत पाहिले आहेत. आजच्या या विक्रमी विजयानंतर केजरीवाल यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर टाकलेली नजर...6 / 18केजरीवाल यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ रोजी हरियाणामध्ये झाला.7 / 18एका मध्यमवर्गीय कुटुंबात गोविंद राम आणि गीता देवी यांच्या पोटी अरविंद यांचा जन्म झाला. केजरीवाल यांच्या बालपणीचा बरासचा काळ सोनपत, गाझियाबाद आणि हिस्सार परिसरामध्ये गेला. हिस्सारच्या कॅम्पस स्कूल आणि सोनपतच्या ख्रिश्चन मिशनरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.8 / 18आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवीचे शिक्षण घेतले.9 / 18सन १९८९ मध्ये जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये केजरीवाल यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.10 / 18 १९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी टाटा स्टीलला सोडचिठ्ठी. त्यानंतर १९९५ मध्ये भारतीय महसुली खात्याच्या (आयआरएस) सेवेसाठी निवड. आयकर विभागात सहआयुक्त म्हणून कामाचा अनुभव केजरीवाल यांच्य पाठीशी आहे. भारतीय महसुली खात्याच्या सेवेत असतानाच डिसेंबर १९९९ मध्ये मनिष सिसोदिया आणि अन्य साथीदारांबरोबर दिल्लीत ‘परिवर्तन’ या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.11 / 18सन २००६ मध्ये भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा भाग म्हणून जनतेला माहितीचा अधिकार मिळवून देण्यासाठी ‘परिवर्तन’ या चळवळीतर्फे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित. त्याचवर्षी महसुली खात्याच्या सेवेचा राजीनामा देऊन भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या कामात स्वत:ला झोकून दिले.12 / 18२०११ मध्ये अण्णा हजारे आणि किरण बेदी यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत साथ देण्यासाठी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेची स्थापना. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून देशाचे वातावरण ढवळून काढणाऱ्या जनलोकपालची मागणी.13 / 18सन २०१२ मध्ये आम आदमी पक्षाची (आप) स्थापना करीत दिल्लीच्या राजकारणात प्रवेश. २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव करीत, २८ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान.14 / 18अपुऱ्या संख्याबळाअभावी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात आलेल्या अपयशाचे कारण देत अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या सत्तेवरून पायऊतार.15 / 18२०१३ पासून केजरीवाल हे राजकीय पटलावर मोदींचे प्रमुख विरोधक म्हणून समोर येताना दिसत आहेत. २०१३ साली आपने पहिल्यांदाच दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली.16 / 18त्यानंतर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल यांनी वाराणसीमधून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये केजरीवाल पराभूत झाले होते.17 / 18केंद्रात मोदी सरकार सत्तेत असताना २०१५ साली आपने पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता काबीज केली. या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने ७० पैकी ६७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.18 / 18२०२० च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला यश मिळाले