Know, father chief minister & Son Minister is first time happens in politics?
जाणून घ्या, वडील मुख्यमंत्री अन् मुलगा मंत्री हे राजकारणात पहिल्यांदाच घडलंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 7:00 PM1 / 6शेख अब्दुला आणि फारुख अब्दुला जम्मू काश्मीरच्या राजकारणात अब्दुला घराण्याचं वर्चस्व होतं. १९८२ मध्ये शेख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. तर त्यांचे चिरंजीव फारुक अब्दुल्ला त्यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री होते. 2 / 6चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश चंद्राबाबू नायडू यांची आंध्रप्रदेशात सत्ता आल्यानंतर त्यांनी चिरंजीव नारा लोकेशला त्यांच्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं होतं. त्याच्याकडेची आयटी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. 3 / 6करुणानिधी आणि स्टॅलिन करुणानिधी २००६ मध्ये पाचव्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपदावर होते. तर २००९ मध्ये करुणानिधींनी स्टॅलिनला उपमुख्यमंत्री बनवले 4 / 6के. चंद्रशेखर राव आणि के टी रामा राव चंद्रशेखर राव तेलंगणाचे २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी मुलगा केटी रामाराव यांच्यावर आयटी मंत्रालयासह अनेक विभागांची जबाबदारी दिली. 5 / 6प्रकाश सिंह बादल-सुखबीर सिंह बादल पंजाबमधील प्रकाशसिंह बादल २००७ मध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात सुखबीर सिंह २००९ मध्ये उपमुख्यमंत्री केले. २०१२ मध्ये अकाली दल पुन्हा सत्तेत आले, तेव्हा वडील मुख्यमंत्री- मुलगा उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.6 / 6देवीलाल आणि रणजित सिंह चौटाला देवीलाल चौटाला १९८७ मध्ये दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचे चिरंजीव रणजीत सिंह चौटाला यांच्यावर कृषिमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications