शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सत्तेसाठी पक्ष सोडणारे नेते

By admin | Published: September 19, 2014 12:00 AM

1 / 6
शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाडमधील आमदार किसन कथोरे हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहे. कथोरेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय आघाडीतील आणखी काही नाराज नेते भाजप - शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते.
2 / 6
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजयकुमार गावित यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गावित यांची कन्या डॉ. हिना गावित या भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आल्या असून तेव्हापासूनच विजयकुमार गावितही राष्ट्रवादीला राम राम करतील अशी चिन्हे होती.
3 / 6
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणा-या सुर्यकांता पाटील यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. पाटील यांनीही भाजपमध्येच प्रवेश केला आहे. मात्र याचा फायदा भाजपला कितपत फायदा होईल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
4 / 6
श्रीगोंदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणारे बबनराव पाचपुते यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हातात घेतले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाचपुते गोत्यात आले होते. विशेष म्हणजे पाचपुतें मंत्रीपदी असताना भाजपच्याच नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
5 / 6
लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या विरोधात प्रचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून शिवबंधनाचा धागा बांधून घेतला आहे. केसरकर यांच्या प्रवेशामुळे कोकण पट्ट्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल अशी शक्यता आहे.
6 / 6
घाटकोपरमधील मनसेचे आमदार राम कदम यांनी गुरुवारी मनसेला जय महाराष्ट्र करुन भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेत भाजपला मिळालेल्या यशानंतर राज्यातील अनेक नाराज नेत्यांची पावले युतीकडे वळली आहेत. या संधीसाधू नेत्यांचा घेतलेला हा आढावा.