Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी? By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 6:33 PM
1 / 7 महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसनेही बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. 2 / 7 बंडखोर उमेदवारांवर काँग्रेसकडून कारवाई होण्यास विलंब झाल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेसने सहा वर्षांसाठी बंडखोर उमेदवारांना निलंबित केले. 3 / 7 रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सुटला आहे. तिथे काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे बंडखोरी करत निवडणूक लढवत आहे. 4 / 7 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख हे निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघात युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केली आहे. 5 / 7 पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. आबा बागुल हे बंडखोरी करत निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. 6 / 7 सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसविरोधातच वसंतदादा पाटील गटाने बंडखोरी केली आहे. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. 7 / 7 कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहे. आणखी वाचा