MPSC Exam Postponed: MPSC विद्यार्थ्यांच्या अघोषित आंदोलनात कसे पोहचले गोपीचंद पडळकर? जाणून घ्या घटनाक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 6:06 PM
1 / 10 १४ मार्च रोजी होणारी MPSC परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला, आज दुपारी अचानक आलेल्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली, सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. (PC Credit - Tanmay Thombare) 2 / 10 पुण्यात हजारोंच्या संख्येने MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे, कोरोनाचं कारण पुढे करत सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, परंतु सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्याच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले, त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 3 / 10 एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पुण्यात सुरु असलेल्या अघोषित आंदोलनात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे नेते बनलेत, आता तर भाजपाच्या इतर नेत्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत आंदोलन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण जे आंदोलन ‘अचानक ‘ सुरु झालं तिथे पडळकर नेमके पोहोचले कसे काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. 4 / 10 गुरुवारी दुपारी १ वाजता एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सुरुवात केली. पुण्यातल्या ज्या परिसरात अनेक अभ्यासिका आहेत त्या शास्त्री रोडवर संतप्त विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला, विद्यार्थी बाहेर पडत आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. 5 / 10 याच वेळी या रस्त्याच्या जवळ असणाऱ्या पत्रकार संघात गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. यावेळी संतापलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांनी आपली भेट घेतल्याचे पडळकरांनी सांगितले.” मी इथे मुंबईतून एका कार्यक्रमासाठी आलो होतो. यावेळी काही विद्यार्थी मला भेटायला आले आणि त्यांना याविषयी मला सांगितलं. मग मी इथे येत विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि एक वाजेपासून इथे बसलो आहे असं त्यांनी सांगितले. 6 / 10 दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या घरच्या आहेराबाबत विचारले असता गोपीचंद पडळकरांनी त्यांनी सूचना नव्हे तर निर्णय घ्यायला हवा आहे अशी टिका केली. पडळकर म्हणाले “ रोहित पवार तुमचा पक्ष सत्तेत आहे. ट्विट नाही निर्णय घ्या” असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला. 7 / 10 सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय असा आरोप पडळकरांनी केला. 8 / 10 त्याशिवाय UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे, तसेच जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोवर रस्त्यावरून बाजूला हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 9 / 10 त्याचसोबत सरकारच्या या निर्णयाचा विरोध काँग्रेस नेत्यांनीही केला आहे, MPSC परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही, कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे योग्य नाही, विद्यार्थींनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा? ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत, कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घ्यायला हव्यात असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 10 / 10 तर एमपीएससीची परीक्षा(MPSC Exam) अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे असं विधान काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे आणखी वाचा