जागतिक दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी सामूहिक लढा उभारल्यास यात यशप्राप्ती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.सुधारणा प्रक्रियेचे सुलभीकरण होण्याची गरज असून प्रशासन सुधारले पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी 20 समूहाच्या नेत्यांना केले.देशात आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सुधारणा प्रक्रियेला जागतिक पातळीवरही विरोध होणे निश्चित असून यास राजकीय दबावापासून दूर ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.जी-20 शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख देशांतील दिग्गज नेत्यांचे आगमन होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यजमान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॅट यांनी मोदींची गळाभेट घेत मोठय़ा उत्साहात स्वागत केले.आपण नुसती आश्वासनं देत नाही तर ती तडीस नेतो असं सांगमा-या नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाहीर केलेले निर्णय पूर्ण होत असल्याचे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दहा दिवसांच्या विदेश दौ-यावर असून त्यांनी म्यानमार फिजी व ऑस्ट्रेलिया या तीन देशांना भेट दिली आहे.