Nepal: who considers Karl Marx as God. Why is k P Oli currently visiting temple?
Nepal: कार्ल मार्क्सला देव मानणारे के. पी ओली सध्या मंदिराभोवती चक्करा का मारतायेत? By प्रविण मरगळे | Published: February 05, 2021 2:14 PM1 / 10नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे गेल्या पाच दशकांपासून स्वयंघोषित नास्तिक आणि कम्युनिस्ट आहेत, परंतु ते निवडणुकीपूर्वी मंदिरांमध्ये चक्कर मारताना दिसत आहेत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी काही महिन्यांपूर्वी संसद भंग करून निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. वास्तविक, सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षात दोन गट पडले आहेत. 2 / 10नेपाळी कम्युनिस्ट पक्षामध्ये माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील एक गट ओलींच्या विरोधात आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की अविश्वास ठराव टाळण्यासाठी ओली यांनी राष्ट्रपती विद्या भंडारी यांच्याकडे शिफारस करुन संसद भंग केली.3 / 10नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली हे मंदिर आणि हिंदू धर्माच्या सर्व विधींच्या पूर्णपणे विरोध करतात. ओली यांनीही बर्याच वेळा जाहीरपणे सांगितले आहे की, देवाचं अस्तित्व नाही आणि जर देव असतो तर तो फक्त कार्ल मार्क्स होता. तथापि, गेल्या आठवड्यात अचानक सर्वकाही बदलले.4 / 10२५ जानेवारी रोजी ओलींनी आपली पत्नी राधिका शाक्य यांच्यासह पशुपतिनाथ मंदिर गाठले आणि सुमारे एक तास पूजा केली. ओलीच्या पूजेवेळी सुमारे १ लाख २५ हजार तूपातून दिवे प्रज्वलित करण्यात आले,5 / 10मंदिराला भेट दिल्यानंतर ओली यांनी त्यांचे सरकार आल्यास देवाला दूध आणि पाणी देण्यासाठी चांदीच्या जालारीऐवजी १०८ किलो सोन्याचे जालरी बसवेल. यासाठी सरकार ३० कोटी रुपये खर्च करेल अशी घोषणाही केली. 6 / 10ओली यांनी सांस्कृतिक मंत्री भानुभक्त आचार्य यांनाही सोन्याची खरेदी करण्यासाठी अतिरिक्त ५० कोटींची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. आचार्य हे पशुपतिनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट (पीएडीटी) चे अध्यक्ष आहेत. ओली मंदिरात गेल्यानंतर तीन दिवसांनी ट्रस्टने बैठक बोलावली ज्यामध्ये नेपाळ राष्ट्रीय बँकेतून एका आठवड्यात सोनं आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टने सांगितले की, कारागिरांना सोन्याचे जालरी करण्यासाठी थेट पैसे दिले जातील.7 / 10ओली हिंदू धर्मातील प्रथापरंपरा आणि विधी स्वीकारताना अशा वेळी दिसले की, जेव्हा देशात त्यांच्या विरोधात वातावरण वाढलं आहे. २००८ पूर्वी नेपाळच्या हिंदू राष्ट्राचा दर्जा परत मिळावा अशीही अनेक संघटनांची मागणी आहे.8 / 10रिपोर्टनुसार, ओली यांना सोन्याची जालारी ११ मार्चपूर्वी बनवायची आहे, कारण ११ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. तथापि, ट्रस्टशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, या अंतिम मुदतीत काम पूर्ण करणे अशक्य आहे, परंतु अक्षय्य तृतीये म्हणजेच १४ मेपूर्वी जालारीचे बांधकाम मंदिरात केले जाऊ शकते. नेपाळमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही तर निवडणुका १० मेपर्यंत संपतील. 9 / 10ओली यांना आता हिंदुत्वाला विरोधकांविरूद्ध शस्त्र बनवायचे आहे. यापूर्वी प्रभू राम हे नेपाळचे आहेत, भारताचा अयोध्येबद्दल प्रचार चुकीचा आहे, असा दावा ओली यांनी केला होता. २०१५ मध्ये जेव्हा भारत-नेपाळ सीमेवर अघोषित आर्थिक नाकेबंदी होती तेव्हा ओली भारतविरोधी अतिरेकी राष्ट्रवादाच्या मदतीने सत्तेत आले. यावेळी पक्षातील विरोधकांशी लढण्यासाठी ओली यांना राष्ट्रवादाबरोबरच हिंदुत्वाचा अवलंब करावा लागत आहे.10 / 10नेपाळमध्ये हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नेपाळमधील ८१ टक्के लोक हिंदू, ९ टक्के बौद्ध आणि ४.४ टक्के मुस्लीम आहेत. याव्यतिरिक्त,३ टक्के कीर्टीस्ट (स्थानिक धर्म) आणि १.४ टक्के ख्रिश्चन आणि ०.२ टक्के शीख आहेत. नास्तिकांची संख्या फक्त ०.६ टक्के आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications