Opinion Poll : UPत पुन्हा योगी सरकार? उत्तर प्रदेशची जनता म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 23:04 IST
1 / 8लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये चार वर्षांपूर्वी प्रचंड बहुमत मिळवत भाजपाने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. मात्र गेल्या चार वर्षांत विविध कारणांमुळे योगींच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान, योगी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराबाबत उत्तर प्रदेशमधील जनतेचे मत ओपिनियन पोलच्या माध्यमातून समोर आले आहे. 2 / 8एबीपी न्यूज-सी व्होटरने केलेल्या सर्वेमधून समोर आलेल्या कलानुसार आजच्या घडीला विधानसभेची निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. 3 / 8या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशच्या जनतेने योगी सरकारची सर्वोत्तम कामगिरी म्हणून रोजगार उपलब्धतेचा उल्लेख केला आहे. २८ टक्के लोकांनी नव्या नोकऱ्या, १२ टक्के लोकांना कोरोनावरील नियंत्रण, १६ टक्के लोकांनी गुन्हेगारांवरील नियंत्रण आणि १६ टक्के लोकांनी राम मंदिर हे योगी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले आहे. 4 / 8रोजगार उपलब्धतेमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण अशी विचारणा केली असता ५३ टक्के लोकांनी योगींच्या नावाचा उल्लेख केला. तर २१ टक्के लोकांनी अखिलेश यादव आणि १६ टक्के लोकांनी मायावतींचे नाव घेतले. 5 / 8योगी सरकारच्या काळात अपराध नियंत्रणात आले का असा प्रश्न विचारला असता ५३ टक्के लोकांनी होकारार्थी तर ३५ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिले. तर १२ टक्के लोकांनी काही सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. 6 / 8या ओपिनियन पोलनुसार आज निवडणुका झाल्यास भाजपाला ४१ टक्के, समाजवादी पक्षाला २४ टक्के, बसपाला २१ टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला केवळ ६ टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते. 7 / 8तर मतांच्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला २८४ ते २९४, समाजवादील पक्षाला ५४ ते ६४, बसपाला ३३ ते ४३ आणि काँग्रेसला १ ते ७ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यात १० ते १६ जागा जातील. 8 / 8या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांमधील १५ हजार ७४७ लोकांचे मत जाणून घेण्यात आले.