parliament monsoon session number game giving advantage to nda after 8 opposition mp suspended
अखेर मोदी सरकारसमोरील 'ते' गणित सुटलं; एका दिवसात संपूर्ण 'नंबर गेम' फिरला By कुणाल गवाणकर | Published: September 21, 2020 4:04 PM1 / 102 / 10राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही खासदारांनी माईक तोडले. तर तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांनी उपसभापतींच्या समोरील नियम पुस्तिका फाडली.3 / 10यानंतर आज गोंधळी खासदारांवर सभापतींनी कारवाई केली. विरोधी पक्षातल्या एकूण ८ खासदारांना सुरू असलेल्या संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.4 / 10विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित झाल्यानं आता राज्यसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बहुमताजवळ आली आहे. त्यामुळे आता दोन्ही सभागृहांमध्ये विधेयकं मंजूर करून घेणं मोदी सरकारसाठी जास्त सोपं होणार आहे.5 / 10लोकसभेत आधीच भाजप बहुमतात आहे. तर आता विरोधी पक्षांच्या खासदारांवर झालेल्या कारवाईमुळे एनडीए राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यसभेत एनडीए पूर्णपणे मिळवेल. कारण उत्तर प्रदेशातून जवळपास १० जागा रिक्त होणार आहेत6 / 10आज आठ खासदारांचं निलंबन झाल्यानं राज्यसभेतील नंबर गेम फिरला आहे. राज्यसभेत भाजपचे ८७ सदस्य आहेत. तर काँग्रेसचे केवळ ४० सदस्य आहेत. 7 / 10राज्यसभेत एकूण २४५ सदस्य आहेत. यामध्ये भाजप प्रणित एनडीएकडे एकूण १०६ सदस्यांचा पाठिंबा आहे. याशिवाय एआयडीएमकेच्या ९ सदस्यांचा सरकारला पाठिंबा मिळतो. त्यामुळे संख्याबळ ११५ वर जातं.8 / 10राज्यसभेतील एकूण सदस्यसंख्या २४५. यातील ११५ सदस्य सरकारच्या बाजूनं असल्यानं १३० सदस्य विरोधात असतात. मात्र आठ खासदारांच्या निलंबनामुळे सदनाची सदस्यसंख्या २३७ वर आली आहे. त्यामुळे आता बहुमतासाठी ११९ आकडा पुरेसा आहे.9 / 10या परिस्थितीत बीजेडीचे ९, वायएसआरचे ६ आणि २ अपक्ष यामुळे एनडीए अगदी सहज बहुमत गाठू शकते. त्यामुळे संपूर्ण अधिवेशनात एनडीएला विधेयकं मंजूर करून घेताना फारशा अडचणी येणार नाहीत.10 / 10१ ऑक्टोबरला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी उत्तर प्रदेशातल्या जागा रिक्त होतील. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत भाजपमध्ये प्रचंड बहुमत असल्यानं राज्यसभेच्या जवळपास १० जागा भाजप जिंकेल. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापासून एनडीए राज्यसभेत बहुमतात असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications