शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रातल्या ४ आत्महत्या अन् ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण; प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य

By प्रविण मरगळे | Published: March 06, 2021 3:45 PM

1 / 10
ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, अलीकडेच गाजणारं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा द्यावा लागला आहे.
2 / 10
पुण्यात एका २२ वर्षीय युवतीने आत्महत्या केली, या आत्महत्येवरून विरोधकांनी संजय राठोड यांच्यावर आरोप केले, या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे, परंतु पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर अनेक ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल झाल्या, त्यात कथित मंत्री आणि अरूण नावाच्या कार्यकर्त्याचं फोन संभाषण व्हायरल झालं, त्यामुळे पूजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला हेदेखील रहस्य आहे.(Pooja Chavan Suicide Case)
3 / 10
त्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदरजवळ आढळला, प्रथमदर्शनी मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला परंतु हिरेन आत्महत्या करणार नाही असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. Mansukh Hiren body found in Mukesh Ambani Bomb scare Issue)
4 / 10
इतकचं नाही तर या प्रकरणाला राजकीय वळणही लागलं आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुतीचे असून सचिन वाझे या तपास अधिकाऱ्यावर शंका उपस्थित केली आहे. वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचा दावा त्यांनी केला, त्याचसोबत जेव्हा ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्पॉट झाली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधीच सचिन वाझे गाडीजवळ पोहचल्याचंही ते म्हणाले.
5 / 10
मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणतीही खून आढळली नाही, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या तोंडात अनेक रुमाल असल्याचं निदर्शनास आले, मनसुख हिरेन पोलिसांना चौकशीत सहकार्य करत होते, ते चांगले स्विमर होते, ते आत्महत्या करणार नाही असं त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे
6 / 10
काही महिन्यांपूर्वी दिशा सालियान या तरूणीने मालाड येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या मुलीवर बलात्कार झाल्याचा दावा विरोधकांनी केला होता, एका पार्टीत या मुलीसोबत अत्याचार झाला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असंही म्हटलं गेलं. .(Disha Salian Death)
7 / 10
दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला सगळं माहिती होतं, त्यानंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृतदेह वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी सापडला, त्यातही सुरुवातीला सुशांत सिंगचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाल्याचा संशय व्यक्त केला, परंतु कालांतराने यात अनेक धागेदोरे पुढे आले, त्यामुळे सुशांत सिंग राजपूत प्रकरणाभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं, ठाकरे सरकरमधील एका मंत्र्याचा सहभाग आहे असा आरोप विरोधकांनी केला होता.(Sushant Singh Rajput)
8 / 10
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन...प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य...आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी.. सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? असा प्रश्न भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून सरकारला विचारला आहे.(BJP Chitra Wagh Questions on Thackeray Government)
9 / 10
तर भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विटरवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दिशा सालियान आनंदी होती तरी तिने आत्महत्या केली, सुशांत सिंग राजपूत स्वप्न पाहणारा होता पण आत्महत्या केली, पूजा चव्हाण धाडसी होती तरीही तिने आत्महत्या केली आणि आता मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दावा केलाय की ते आत्महत्या करू शकत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.(BJP Nitesh Rane Target Mahavikas Aghadi Government)
10 / 10
एकंदर पाहता पूजा चव्हाण, मनसुख हिरेन, दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागे आत्महत्या की हत्या असा संशय विरोधकांनी निर्माण केला आहे, या प्रकरणांचा पोलीस तपास सुरू आहे, परंतु या ४ मृत्यूचं रहस्य सोडवणं ठाकरे सरकारसाठी मोठं आव्हानात्मक असणार आहे.(Controversy over Sushant Singh Rajput, Disha Salian, Pooja Chavan, Mansukh hiren Death)
टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोड