Sachin Vaze:BJP Direct comparison of Chief Minister Uddhav Thackeray with Hitler
Sachin Vaze: “काळ, वेळ बदलला, मात्र वृत्ती तीच हुकुमशाही”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची थेट हिटलरसोबत तुलना By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:10 PM1 / 11ज्याप्रकारे हिटलरने आपली हुकूमशाही चालवून जनतेला त्रस्त करून सोडले होते, त्याचप्रकारे राज्यातही सध्या एक हुकूमशहा जनतेच्या जीवाशी खेळण्याचे आणि बळजबरी कारभार चालवण्याचे षडयंत्र रचत आहे. महाराष्ट्रातील लोकशाही पायदळी तुडवून राज्य करत आहे. काळ, वेळ बदलला, मात्र वृत्ती तीच! अशा शब्दात भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 2 / 11वाझेंना NIAनं अटक केल्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान झाल्याची भूमिका मांडण्यात आली होती. आता नाईलाजानं वाझेंना काढल्यावर 'निलंबित करून दाखवलं,' अशी फुशारकी मारणारी भूमिका मांडण्यात आली, तरी आश्चर्य वाटायला नको. घराचे वासे फिरतात कसे हे वाझेंना समजलेच असेल असा टोला भाजपाने शिवसेनेला लगावला आहे. 3 / 11सचिन वाझेंवरील आरोप आणि मुख्यमंत्र्यांच्या वकिलीमुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांची पुरती कोंडी झाली आहे.. पवारांनी जाहीरपणे एक शब्दही काढलेला नाही. तर 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' न्यायानं गृहमंत्र्यांना चौकशीनंतर काय ते बघू म्हणावं लागलंय असं म्हणत भाजपाने शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. 4 / 11सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावे बाहेर येतायत किंवा येतील आणि यातून झालेली मुंबई पोलिसांची नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. 5 / 11NIAच्या कसून चौकशीमुळे ठाकरे सरकारची झोप उडाली, भाजपानं मागणी लावून धरल्यानं सचिन वाझेंचं निलंबन झालं, 'गॉडफादर'नंच डोक्यावरचा हात काढल्यानं वाझे दुसऱ्यांदा निलंबित, लाडक्या वाझेंमुळे झाले वांदे...अशा शब्दात भाजपानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. 6 / 11त्याचसोबत ठाकरे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अॅडव्होकेट जनरल यांनी न्यायालयाच्या आदेशाने निलंबित असलेल्या सचिन वाझेंना परत घेणं हा न्यायालयाचा अवमान ठरेल, असे मत त्यांनी दिले होते. तरीही वाझेंना परत घेऊन CIBचा प्रमुखही करणं ठाकरे सरकारसाठी इतकं गरजेचं का होतं? हा आटापिटा नेमका कशासाठी होता? असंही भाजपाने विचारलं आहे. 7 / 11एका निलंबित अधिकाऱ्यासाठी सरकार किती कार्यक्षम असू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन वाझे. १६ वर्ष निलंबित अधिकाऱ्याला सगळे कायदे-नियम पायदळी तुडवून CIB युनिटचं इनचार्ज करण्याची ठाकरे सरकारची अशी काय मजबुरी होती? असा प्रश्न भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारला आहे. 8 / 11२५ मार्चपर्यंत एनआयए कोठडीत असलेल्या सचिन वाझेंकडून जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी माहिती काढून घेण्यात NIAला यश आलंय. वाझेंची वकिली करणारे आणि त्यांच्यावर वरदहस्त ठेवणारे अशा सगळ्यांच्याच चौकशीची चिन्हं आहेत. त्यामुळे सत्य काय ते सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होईलच असा इशाराच भाजपाने शिवसेनेला दिला आहे. 9 / 11स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ नेण्याचा नेमका उद्देश काय? या प्रकरणात आणखी पोलिस अधिकारी, राजकीय नेते वा अन्य कुणाचा समावेश आहे का, याबाबत तपास सुरू आहे. NIAच्या चौकशीतून वाझेंचा बोलविता धनी कोण, हे स्पष्ट होईल. वाझेंवर वरदहस्त होता, त्यांचे चेहरेही प्रकाशात येतीलच असंही भाजपाने म्हटलं आहे. 10 / 11सोयीचं राजकारण - शिवसेनेच्या लाडक्या सचिन वाझे यांचा सहभाग होता, ते मनसुख हिरेन प्रकरण तपास NIAकडे देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. खासदार संजय राऊत यांनीही मुंबई पोलिस, ATS सक्षम वाटत होतेच. मात्र, भीमा कोरेगावचा तपास त्याच मुख्यमंत्र्यांनी परस्पर NIAकडे दिला असं सांगत भाजपानं शिवसेनेवर सोयीचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. 11 / 11NIA च्या या कारवाईनंतर आता सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. याचपार्श्वभूमीवर कारवाई करवाई करण्यात आली आहे. सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications