By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 09:48 IST
1 / 10कोलकाता : देशात सध्या चार राज्ये आणि एक केंद्रशासित राज्य अशा पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापैकी हायव्होल्टेज असलेल्या आणि भाजपा-तृणमूलसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीने आघाडीमध्ये उभी फूट पाडली आहे.2 / 10महाराष्ट्रात तसेच लोकसभेत काँग्रेससोबत लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार स्वत: तिथे प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे. 3 / 10पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांच्या साथीने वेगळी लढत आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे. यामुळे केंद्रात आघाडी असलेल्या विरोधी पक्षांनी ममता यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.4 / 10शरद पवार यांनी काही आठवड्यांपूर्वी भाजपाविरोधात पश्चिम बंगालमध्ये आघाडीची मोट बांधणार असल्याचे वक्तव्य केले होते. परंतू त्यानंतर दोन तीन दिवसांत काँग्रेसने डाव्यांच्या साथीने वेगळी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे पवारांच्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे दिसू लागले होते. 5 / 10परंतू शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधली आहे. यामध्ये त्यांचा राष्ट्रवादी पक्ष, झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा सहभाग आहे. हे सारे नेते पश्चिम बंगालमध्ये ममता यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. 6 / 10तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनुसार शरद पवारांनी प्रचारसभांच्या तारखाही निश्चित केल्या आहेत. बंगालची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मानली जात आहे. भाजपा नेहमीप्रमाणे केंद्रीय नेते, राज्यांचे मुख्यमंत्री अशी फौज प्रचारात उतरविणार आहे. याला कडवी टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पवारांना आता भाजपाबरोबरच काँग्रेस-डाव्यांविरोधातही लढावे लागणार आहे. 7 / 10ही अनोखी युती ममता यांच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे भाजपामध्ये देखील चिंता वाढू लागली आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांना झालेला अपघात की घातपात यावर वातवरण तापल्यास त्याचा फटकादेखील भाजपाला बसण्याची शक्यता आहे. ममता यांनी कोलकातामध्ये काल व्हीलचेअरवरून रॅली काढली होती.8 / 10पश्चिम बंगालच्या सीमा या झारखंड, बिहारला लागून आहेत. तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जिवावर बिहार निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. सोरेन, यादव यांचा फायदा देखील या निवडणुकीत होणार आहे. यामुळे पवारांनी हे ध्यानात घेऊन या पक्षांची मोट बांधली आहे. हे पक्ष निवडणूक न लढविता या भागात प्रचार करणार आहेत. 9 / 10बंगालमध्ये भाजपा-तृणमूल असा वरवरचा संघर्ष दिसत असला तरी तो ग्राऊंडवर टीएमसी आणि डाव्यांमध्ये आहे. काँग्रेस किंवा भाजपासारखे राष्ट्रीय पक्ष या राज्यात प्रमुख भुमिकेत राहिलेले नाहीत. ममतांनी जेव्हा काँग्रेस सोडून आपला नवा पक्ष बनविला तेव्हापासून काँग्रेस संपत गेली. 10 / 102019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाला फारसा आधार नव्हता. परंतू गेल्या काही महिन्यांत भाजपाने टीएमसीचे बडे नेते आमदार फोडले आहेत. यामुळे तृणमूलसमोर आता डावे आणि भाजपा असे दोन विरोधक आहेत.