अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख By बाळकृष्ण परब | Published: February 09, 2021 3:57 PM
1 / 5 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना आज राज्यसभेत निरोप देण्यात आला. आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. त्यानिमित्ताने आज आपण पाहूयात गुलाम नबी आझाद यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानातील बाग नेमकी कशी आहे ती. 2 / 5 राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आपल्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी विविध फुलझाडांचा वापर करून एक उत्तम बाग सजवली आहे. मोदी आझाद यांच्या या कौशल्याचे कौतुक करताना म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांना बागकामाची आवड आहे. ते म्हणतात की, मी दिल्लीमध्येच काश्मीर तयार केलं आहे. 3 / 5 गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या या आवडीसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी फुलवलेली बाग सीपीडब्ल्यूडीच्या स्पर्धेत अनेकदा प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. 4 / 5 आझाद यांच्या निरोपाचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दहशतवादी हल्ल्याच्या उल्लेख करून भावूक झाले आणि त्यांनी त्यावेळी काश्मीरचे मुख्यमंत्री असलेल्या आझाद यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली. त्यानंतर आझादही आपल्या भाषणादरम्यान भावूक झाले. 5 / 5 गुलाम नबी आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात जेडीयूचे नेते रामचंद्र प्रसाद सिंह यांनीही आझाद यांच्या बागकामाचे कौतुक केले. तसेच तुम्ही जशी बाग सांभाळता, तसेच समाजालाही सांभाळता, असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. आणखी वाचा