thackeray government ask for report about 5 officers went to israel in november 2019
सत्तासंघर्ष सुरू असताना 'ते' ५ जण इस्रायलमध्ये काय करत होते?; ठाकरे सरकारनं अहवाल मागवला By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 6:56 PM1 / 10गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. एकत्र निवडणूक लढलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला.2 / 10मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजप पाळत नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली. तर तसा कोणताही शब्द दिलाच नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात सत्ता स्थापन केली. 3 / 10ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये शिवसेना-भाजपची बोलणी फिस्कटली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी सुरू केली. राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडत असताना मंत्रालयातील ५ अधिकारी इस्रायलमध्ये होते. हे अधिकारी आता अडचणीत आले आहेत.4 / 10पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून अनेक केंद्रीय मंत्री, न्यायमूर्ती आणि पत्रकारांबद्दलची गोपनीय तपशील त्यांच्या फोनमधून गोळा करण्यात येत असल्याची माहिती समोर आल्यानं देशात खळबळ उडाली आहे. पेगासस यंत्रणा इस्रायलची आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना ५ अधिकारी इस्रायलच्याच दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे संशय वाढला आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.5 / 10मंत्रालयात माहिती आणि जनसंपर्क विभागात काम करणारे ५ अधिकारी १४ नोव्हेंबर २०१९ रोजी इस्रायलला गेले. त्यांचा दौरा १० दिवसांचा होता. त्यावर २० लाखांचा खर्च झाला. मात्र याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला मिळालेला नाही.6 / 10विधाससभेची निवडणूक झाल्यानं आणि नवं सरकार अद्याप सत्तेत न झाल्यानं त्यावेळी राज्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे इस्रायल दौऱ्यावर जाण्याआधी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेणं गरजेचं होतं. मात्र निवडणूक आयोग, केंद्र सरकार यांची परवानगी न घेता ५ अधिकारी इस्रायलला गेले.7 / 10सोशल मीडियाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ५ अधिकारी इस्रायलला गेले होते. अधिकाऱ्यांनी परदेश दौरा केल्यानंतर त्यांना अहवाल सादर करावा लागतो. दौऱ्यातून मिळालेली माहिती, त्याचा प्रशासकीय कारभारात होणारा वापर याचा तपशील अधिकाऱ्यांना अहवालाच्या स्वरुपात द्यावा लागतो. मात्र त्या ५ अधिकाऱ्यांनी तसा कोणताही अहवाल राज्य सरकारला दिलेला नाही.8 / 10पेगासस स्पायवेअर, त्या माध्यमातून ठेवण्यात आलेली पाळत आणि त्याचं इस्रायल कनेक्शन यामुळे ठाकरे सरकारनं सावध पवित्रा घेतला आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना ५ अधिकारी इस्रायलमध्ये काय करत होते, त्याचा अहवाल ठाकरे सरकारनं मागवला आहे.9 / 10इस्रायल दौऱ्यादरम्यान ५ अधिकाऱ्यांसोबत काही व्यक्ती होत्या अशी दाट शक्यता आहे. या दौऱ्याच्या टायमिंगमुळे ५ अधिकारी अडचणीत आले आहेत. या दौऱ्याचा संपूर्ण तपशील ठाकरे सरकारनं अधिकाऱ्यांकडे मागितला आहे.10 / 10१० दिवसांच्या इस्रायल दौऱ्यात कोणाची भेट घेतली, कोणकोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या, त्याचा काय फायदा झाला, याची माहिती ५ अधिकाऱ्यांना सरकारला द्यावी लागणार आहे. ५ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications