Uttar Pradesh Rajya Sabha Election All Candidates Elected Unopposed
न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास By कुणाल गवाणकर | Published: November 02, 2020 5:53 PM1 / 11उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. नाव मागे घेण्याचा कालावधी संपताच निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.2 / 11विशेष म्हणजे आज भाजप आणि काँग्रेसनं एकाच वेळी इतिहास रचला आहे. आज भाजपनं राज्यसभेच्या ८ जागा जिंकल्या. तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली.3 / 11उत्तर प्रदेशातून भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, अरुण सिंह, माजी डीजीपी बृजलाल, नीरज शेखर, हरिद्वार दुबे, गीता शाक्य, बीएल शर्मा आणि सीमा द्विवेदी हे ८ जण निवडून गेले आहेत.4 / 11समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव, तर बहुजन समाज पक्षाकडून रामजी गौतम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. 5 / 11आजच्या विजयामुळे भाजप राज्यसभेतला आपला सर्वोच्च आकडा गाठला आहे. तर काँग्रेसची अवस्था सर्वात वाईट झाली आहे.6 / 11२५ नोव्हेंबरला राज्यसभेच्या १० सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये भाजपच्या ३, समाजवादी पक्षाच्या ४, बसपच्या २ तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.7 / 11राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे ९ उमेदवारांना विजयी करता येईल इतकं संख्याबळ होतं. मात्र त्यांनी एक उमेदवार कमी दिला. 8 / 11भाजपनं टाकलेल्या डावानं सगळ्यांनाच धक्का बसला. यावरून प्रचंड राजकारण झालं. बसप आणि भाजपनं हातमिळवणी केल्याचा आरोप सप आणि काँग्रेसनं केला.9 / 11उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ११ जागांचे निकाल स्पष्ट झाल्यानं भाजपनं राज्यसभेत शिखरावर आहे. तर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे.10 / 11एकूण २४५ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत आता भाजपचे ९२ सदस्य आहेत. भाजपच्या मित्रपक्षांचा आकडा लक्षात घेतल्यास ही संख्या ११२ वर जाते. त्यामुळे एनडीए बहुमतापासून ११ जागा दूर आहे.11 / 11राज्यसभेतील काँग्रेसची स्थिती आणखी दयनीय झाली आहे. सदनात काँग्रेसचे ३८ सदस्य आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications