शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होऊ दे चर्चा! डॅशिंग तिची अदा, चाहते झाले फिदा; TMC खासदार मिमी चक्रवर्तीचे व्हायरल फोटो पाहा

By प्रविण मरगळे | Published: September 22, 2020 5:50 PM

1 / 10
मिमी चक्रवर्ती या पश्चिम बंगालमधील जादवपूर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार आहेत. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि संसदेत पोहोचली.
2 / 10
राजकारणात येण्यापूर्वी मिमी चक्रवर्तीची ओळख सुपरहिट बंगाली अभिनेत्री म्हणून होती. मिमी आजकाल राजकारणात तसेच सोशल मीडियामध्ये खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच तिने काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहे.
3 / 10
मिमी चक्रवर्ती यांनी हे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. मिमी चक्रवर्ती हे नाव कदाचित पश्चिम बंगालखेरीज अन्य राज्यांतील लोकांना माहीतही नसेल. ती बंगाली चित्रपट अभिनेत्री म्हणून तेथील लोकांना माहीत आहेत.
4 / 10
पण आता मिमीला वेगळी ओळख मिळाली आहे. त्या तृणमूल काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मिमी चक्रवर्ती या जादवपूर मतदारसंघातून, तर तिच्यासोबतच अभिनेत्री नुसरत जहां या बशीरहाट मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
5 / 10
या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाने तृणमूल काँग्रेसविरुद्ध प्रचाराची राळ उठवली होती. पण मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां या भाजप उमेदवारापेक्षा अडीच ते पावणेतीन लाख अधिक मते मिळवून विजयी झाल्या. मिमी यांचे वय ३० आहे
6 / 10
या फोटोमध्ये मिमी चक्रवर्ती बरीच सुंदर दिसत आहे. निवडून आल्यानंतरही मिमीने संसद भवनात नवीन ओळखपत्र मिळाल्यानंतर फोटो काढले होते, हे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
7 / 10
मिमी चक्रवर्तीचा फॅन फॉलोइंग सोशल मीडियात खूप जास्त प्रमाणात आहे. तिच्या सोशल अकाऊंट्सला लाखो लोक फॉलो करतात.
8 / 10
मिमी चक्रवर्तीची लोकप्रियता पश्चिम बंगालमध्ये इतकी आहे की, पहिल्याच एन्ट्रीमध्ये लोकांनी तिला भरभरुन मतदान करुन लोकसभेत खासदार म्हणून पाठवले.
9 / 10
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आदर्श मानत मिमीने राजकारणात प्रवेश केला. तिने अनेकदा जाहीर व्यासपीठावरुन ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे.
10 / 10
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आदर्श मानत मिमीने राजकारणात प्रवेश केला. तिने अनेकदा जाहीर व्यासपीठावरुन ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे.
टॅग्स :Member of parliamentखासदारPoliticsराजकारण