शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या

By प्रविण मरगळे | Published: January 13, 2021 11:00 AM

1 / 12
राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. राज्यातील या घटनेने विरोधकांनी सरकारवर टीका करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
2 / 12
बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे. पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले होते, मात्र त्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे.
3 / 12
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर भाजपा महिला आघाडीने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कोण? याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. ही आरोप करणारी महिला ही पार्श्वगायिका आहे.
4 / 12
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानं रेणु शर्मा चर्चेत आल्या, रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे यांची भेट पहिल्यांदा कधी झाली?, या दोघांचे नाते काय? याबाबत सविस्तर खुलासा खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा यांची बहिण रेणु शर्मा आहे. ब्लॅकमेलिंगसाठी खोटे आरोप करत असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे.
5 / 12
धनंजय मुंडे आणि रेणु शर्मा पहिल्यांदा १९९७ मध्ये इंदूरमध्ये भेटले, या दोघांची भेट मध्य प्रदेशातील बहिण करूण शर्मा यांच्या घरी झाली, त्यावेळी रेणुचं वय १६-१७ वर्ष होतं, १९९८ मध्ये धनंजय मुंडे यांनी करूण शर्मा यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता.
6 / 12
२००६ मध्ये जेव्हा करूण शर्मा प्रसुतीसाठी इंदूरला आल्या होत्या, तेव्हा मी घरी एकटी असल्याचं धनंजय मुंडे यांना माहिती होतं, तेव्हा काहीही न सांगता ते घरी आले आणि माझ्या इच्छेविरोधात शारिरीक संबंध बनवले, प्रत्येक दोन-तीन दिवसांच्या अंतराने ते घरी येत होते, इतकचं नाही तर शारिरीक संबंध बनवताना माझा व्हिडीओही बनवला होता.
7 / 12
त्यानंतर वारंवार धनंजय मुंडे मला फोन करून माझ्यावर खूप प्रेम असल्याचं सांगत होते, जर तुला गायिका बनायचं असेल तर माझी बॉलिवूडमध्ये अनेक बड्या दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत ओळख आहे. मी तुला लॉन्च करतो असं आमिष मला दाखवत होते.
8 / 12
बॉलिवूडमध्ये गायिका बनवण्याच्या बहाण्याने त्यांनी वारंवार माझं लैंगिक शोषण केले. जेव्हा माझी बहिण करूणा शर्मा कामासाठी बाहेर जात होती, तेव्हा धनंजय मुंडे माझ्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता असा आरोप तरूणीने केला आहे.
9 / 12
तर करूणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
10 / 12
माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणु शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.
11 / 12
या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे असंही त्यांनी सांगितले आहे.
12 / 12
या सर्व तक्रारी खोट्या आहेत, करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅंकमेलिंग करत कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएसमसरुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेRapeबलात्कारPoliceपोलिस