When Vajpayee went to jail for farmers; Congress had to find a jail for him in 1973
जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 1:31 PM1 / 10मोदी सरकारद्वारे दोन महिन्यांपूर्वी आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी अडून बसले आहेत. विरोधकांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. 2 / 10मोदी सरकारद्वारे दोन महिन्यांपूर्वी आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी अडून बसले आहेत. विरोधकांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. 3 / 10१९७४ मध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पिच तयार केले जात होते. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार होते आणि मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा होत्या. तेव्हा वाजपेयी जनसंघाचे नेते होते. तसेच नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये ते मोजले जात होते. 4 / 10१९७३ मध्ये गव्हाचे चांगले उत्पादन झाले होते. तर उत्तरप्रदेश सरकार शेतकऱ्यांना सरकारी दराने गहू विकण्यासाठी दबाव आणत होते. यासाठी सर्व शेतकऱ्यांना सरकारी दरानेच गहू विकण्याचा आदेश काढण्यात आला होता. 5 / 10चांगले पीक आल्याने बाजारभावही चांगला मिळत होता. मात्र, सरकारी आदेशामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. यामुळे जनसंघाने सरकारविरोधात देशभर आंदोलन छेडले होते. 6 / 10उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाची जबाबदारी वाजपेयींच्या खांद्यावर होती. अशावेळी हजारो लोकांना एकत्र करत वाजपेयींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यामुळे वाजपेयींना लखनऊमध्ये अटक करण्यात आली. 7 / 10पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. मात्र, तरीही कार्यकर्ते आणि शेतकरी मागे हटायला तयार नव्हते. आंदोलकांची संख्याच एवढी मोठी होती, की वाजपेयींना स्थानिक तुरुंगात ठेवता येत नव्हते. यामुळे वाजपेयींना देशातील सर्वात सुरक्षित तुरुंग नैनीमध्ये हलविण्यात आले होते.8 / 10शेतकरी आंदोलनामुळे वाजपेयींसोबत ५०० लोकांना नैनी जेलच्या पाच नंबर बराकमध्ये ठेवण्यात आले होते. या तुरुंगात वाजपेयी पाच दिवस बंद होते. नंतर त्यांना जामिन देण्यात आला. 9 / 10यानंतर आणीबाणीमध्ये वाजपेयींना जेलमध्ये जावे लागले होते. पुढे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर वाजपेयी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी पाऊले उचलली. 10 / 10गव्हाचा दर १९.६ टक्क्यांनी वाढवून त्यांनी इतिहास रचला होता. तसेच साखर कारखान्यांना लायसन्सच्या जोखडातून मुक्त केले होते. कृषी विमा योजना तयार केली. किसान क्रेडिट कार्डची सुविधाही वाजपेयींनीच सुरु केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications