Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांची नानांसोबत 'समाधान'कारक भेट, मोदीमगही दिला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 17:01 IST
1 / 9बॉलिवूडचा डॅगिंश अभिनेता आणि मराठमोळा कलाकार नाना पाटेकर यांचे देशभरात चाहते आहेत. तिरंगा, क्रांतीवर, अब तक 56 यांसारख्या चित्रपटांतून नानाने आपल्या भूमिकेचा ठसा समाजमनावर कोरला आहे. 2 / 9मुंबईच्या 26/11 हल्ल्यावर बनविण्यात आलेल्या चित्रपटातही नाना पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेतून आपल्या कामाची ओळख करून दिलीय. तर, अलिकडेच आलेल्या वेलकम चित्रपटातूनही जबरदस्त कॉमेडी केलीय. 3 / 9नाना पाटेकरला परिंदा, क्रांतीवीर या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही नानांचा वेगळाच दबदबा आहे. 4 / 9नाना पाटकरचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसी मैत्रीचे संबध आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही नानाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर, कोकणचे नेते नारायण राणे, सुनील तटकरे हे नानांचे मित्र आहेत. 5 / 9नाना कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नाही, तसेच राजकारण प्रवेश करण्याचा कुठलाही मानस नाही, असेही नानाने यापूर्वीच सांगितले होते. 6 / 9नानाला सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी व्हायला आवडते. म्हणून अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत नानाने नाम फाऊंडेशन नावाने शेतकऱ्यांना मदत करणारी संस्था उभारली. 7 / 9आता, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पाटेकर यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत पाटील यांनी नानां एक पुस्तक आणि मोदींचं चित्र असलेला मगही भेट दिलाय. 8 / 9पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, नानांची कडकडून गळाभेट घेतल्याचे दिसून येते. 9 / 9यावेळी समाधान या माझ्या कॉफीटेबल बुकची प्रत भेट दिली. तसेच, अनेक विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्याचेही पाटील यांनी सांगितले.