For the Chief Minister, the stove is battered, while Ajit Pawar's tour in nana patekar house
Nana Patekar: मुख्यमंत्र्यांसाठी चुलीवरचं पिठलं तर अजित पवारांचा फेरफटका By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2022 4:15 PM1 / 10अभिनेता नाना पाटेकर दरवर्षी मोठ्या उत्साहात आपल्या घरी गणपती बसवत असतात. यंदाही कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी त्यांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. त्यानंतर, अनेक दिग्गजांना आपल्या घरी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बोलावल्याचं पाहायला मिळालं. 2 / 10महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. 3 / 10गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांनी अगदी पहाटे ४ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे. तर, अनेक दिग्गजांच्याही घरी भेटी दिल्या आहेत. त्यातच, आज पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.4 / 10एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यावेळी पाटेकर यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. 5 / 10यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला नाना बाहेरच उभे होते. त्यामुळे गाडीतून उतरताच नाना आणि शिंदे यांची गळाभेट झाली.6 / 10नानांची गळाभेट होताच, निसर्गाच्या सानिध्यात... अशा शब्द मुख्यमंत्र्यांनी उच्चारला. त्यावेळी, सर्वचजण हसले. त्यानंतर, गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर नानांनी स्वत: चुलीवर बनवलेलं पिठलं आणि भाकरीचा आस्वाद मुख्यमंत्र्यांनी घेतला. दरम्यान, नाना पाटेकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. 7 / 10मुख्यमंत्र्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नानांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. स्वत; अजित पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. 8 / 10अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी आज भेट दिली. गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेत शेतकरी बांधव व सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यनिमित्तानं नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसच्या परिसरात फेरफटका मारला, असे अजित पवार म्हणाले. 9 / 10नाना पाटेकर यांनी नेहमीच सर्वच पक्षातील नेत्यांशी आपले ऋणानुबंध जपले आहेत. त्यामुळे, व्यक्तीगत पातळीवर त्यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे, राज्याचे सत्ताधारी आणि विरोधकही त्यांच्या घरी आवर्जून जातात10 / 10मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याेंनीही नानांच्या घरी भेट दिल्याचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. त्यामध्ये, अगदी गळाभेट घेण्यापासून ते बाप्पांचे दर्शन घेण्यापर्यंतच्या फोटोंचा समावेश आहे आणखी वाचा Subscribe to Notifications