Highlights from Dr Ambedkar Museum
आठवणी महामानवाच्या! डॉ आंबेडकरांच्या वस्तुसंग्रहालयातील काही क्षणचित्रे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 6:11 PM1 / 5डॉ आंबेडकर यांनी ज्या खुर्चीवर बसून आणि टेबलाचा आधार घेत भारताचे संविधान लिहिले ते सर्व भारतीयांसाठी अभिमानाचे असलेले खुर्ची व टेबल या संग्रहालयात मांडलेले आहे. 2 / 5देशविदेशातून ज्ञान संपादन केलेल्या डॉ आंबेडकर यांच्या घरातील ही आरामखुर्ची. आयुष्यातील अनेक विचार त्यांनी या खुर्चीवर बसून केले, अनेकांचे प्रश्न सोडवले. 3 / 5कायदेतज्ञ असलेले डॉ. आंबेडकर प्रचंड विद्वान होते. त्यांचे महापरिनिर्वाण होणाच्या आधी त्यांनी शेवटच्या जाहिरव कार्यक्रमात घातलेला कोट इथे बघायला मिळतो. 4 / 5डॉ आंबेडकर यांनी शेवटचा श्वास घेतला तोच हा पलंग. 5 / 5 डॉ आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी असलेला अस्थिकलश या वस्तुसंग्रहालयात मांडला असून त्याचे दर्शन घेण्यासाठी कायम गर्दी असते. त्यासोबत डॉ आंबेडकर यांना बहाल केलेले सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान अर्थात 'भारतरत्न' पदकही मांडलेले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications