How much money compared to a rickshaw? Ajit Pawar's Metro travel, interaction with passengers
रिक्षाच्या तुलनेत किती पैसे?; अजित पवारांचा मेट्रोने प्रवास, प्रवाशांसोबत संवाद By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:15 PM1 / 11राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. त्यांच्या कामाची आणि सकाळी-सकाळी कामाला सुरुवात करण्याची अनेकदा चर्चा होत असते. 2 / 11आज पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी सकाळीच मेट्रोने प्रवास करत इच्छित स्थळ गाठले. यावेळी, मेट्रोमधील प्रवाशांसोबत दिलखुलासपणे संवाद साधला. 3 / 11विशेष म्हणजे, प्रवाशाना मेट्रोचे तिकीट, रिक्षाचे भाडे यांच्यातील फरकही उपमुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यावेळी, प्रवाशांनीही मेट्रोमुळे प्रवास सहज-सोयीचा झाल्याचे म्हटले. 4 / 11उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या मेट्रोतून प्रवास केला असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सोबत होते. यावेळी त्यांनी उभ्यानेच प्रवास करत पुणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.5 / 11अजित पवार यांच्यासमवेत मेट्रोचेही अधिकारी उपस्थित होते, ते त्यांना माहिती देत होते. यावेळी, प्रवाशांचे तिकीटदर आणि मासिक पाससंदर्भातही त्यांनी माहिती विचारली. 6 / 11मेट्रोचा सकाळचा आणि रात्रीचा टाइम काय आहे, किती वाजेपर्यंत रात्री मेट्रो सुरू असते, आणि सकाळी किती वाजता सुरू होते, असेही अजित पवारांनी विचारले. 7 / 11 अजित पवार हे चांदणी चौकाच्या नव्या पुलाच्या उद्घाटनासाठी जात असताना त्यांनी रूबी हॉल ते वनाज कॉर्नर पर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत गप्पा मारल्या. 8 / 11चांदणी चौकाच्या उद्घाटनासाठी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. त्याच कार्यक्रमासाठी जाण्यासाठी अजित पवारांनी मेट्रोने प्रवास केला. 9 / 11दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी, अजित पवारही उपस्थित होते.10 / 11गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट हा विस्तारीत मार्ग असून यामुळे आता रूबी हॉलपासून वनाज कॉर्नर आणि सिव्हील कोर्ट ते पिंपरी पर्यंत प्रवास करण्यात येणार आहे.11 / 11पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी अजित पवार आज पुण्यात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications