शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मी उद्धव ठाकरेंना दररोज फोन करतो, पण...'; नारायण राणेंनी पत्रकारांना स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 3:23 PM

1 / 6
याचदरम्यान पुण्यातील काही पत्रकारांनी मुख्यमंत्र्याची तब्येत ठीक नाही. त्यामुळे तुम्ही त्यांची विचारपूस केली की नाही? असा प्रश्न नारायण राणेंना विचारला. त्यावर नारायण राणे यांनी मी मुख्यमंत्र्यांची दररोज विचारपूस करतो, अशी प्रतिक्रिया दिली.
2 / 6
मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या मुख्यमंत्री आराम करत आहेत.
3 / 6
नारायण राणे म्हणाले की, मी त्यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करतो. पण ते फोन घेत नाहीत. मग शिवसेनेचे अनेक नेते ओळखीचे आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत विचारत असतो.अधिवेशनात कधी कधी शिवसेनेचे नेते संजय राऊत भेटतात. त्यावेळी तुमचे साहेब कसे आहेत?, अशी विचारणा त्यांना करतो. आमचे साहेब चांगले आहेत, असं उत्तर संजय राऊत देतात, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.
4 / 6
केंद्रीय मंत्रिपदाबाबत देखील नारायण राणे यांनी खुलासा केला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, तुम्ही दिल्लीत जा आणि सुखी राहा. भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला. दिल्लीला गेलो आणि आता केंद्रीय मंत्री पदावर आहे, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
5 / 6
पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम सेंटरला पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटरला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
6 / 6
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याचं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर महत्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ. शेखर भोजराज यांनी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया केली आहे.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाPuneपुणेShiv Senaशिवसेना