शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

MBBS चा नंबर थोडक्यात हुकला, महादेव जानकरांनी सांगितली 12 वीच टक्केवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 8:28 PM

1 / 8
पुण्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादे व जानकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जानकर यांनी कॉलेज जीवनातील आठवण सांगितली.
2 / 8
बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती देत, त्यावेळी डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगल्याचंही ते म्हणाले. मित्रांनो, अपयश आले तर घाबरून जाऊ नका. मी कॉलेजच्या काळात खूप वाचन केले.
3 / 8
थोर राजकारण्यांसह महात्मा फुले, कार्ल मार्क्स, स्वतंत्र्यावीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामायण, महाभारत असे सगळेच वाचून काढले. त्यामुळे आपल्याला नवीन विचार कळतात. त्यातूनच आपल्याला अडचणीतून मार्ग काढता येतो, असे जानकर यांनी म्हटले.
4 / 8
कामासाठी भांडत बसू नका. तर काम देणारे बना. मी इंजिनिअर असून मला पशुसंवर्धन खातं दिले. पण मला अजून हे कळालेले नाही. खासदार, आमदार मंत्री होणे सोप्प नाही. पक्ष सांभाळणे सोप्प नाही, असेही ते म्हणाले.
5 / 8
मला ९१ टक्के मार्क असून एमबीबीएसला (MBBS) प्रवेश मिळाला नाही. कारण कट ऑफ ९१.३ टक्के लागला. अन् तेव्हा धनगर समाज खुल्या प्रवर्गात मोडत होता. मग मी आत्महत्या करायला गेलो होतो.
6 / 8
मात्र, शंतनुराव किर्लोस्कर (Shantanurao Kirloskar) यांचे एक वाक्य आठवले की, ‘आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे.’ अन् त्यांच्या या एका वाक्याने विचार बदलला. मग मेरीटमधूनच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.
7 / 8
मित्रांनो मी पैसे देऊन नाही तर मेरीट लिस्टमधूनच इंजिनिअर झालो आहे. मी हे का सांगत आहे. कारण ‘जिस समाज का दल है… उस समाज का बल है, अशा ध्येयाने काम करणारा मी माणूस आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
8 / 8
राज्याचे मंत्री राहिलेल्या महादेव जानकर यांची हा भूतकाळ ऐकून अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं तर अनेकांनी प्रेरक संदेशही यातून घेतला.
टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरPuneपुणेdoctorडॉक्टर