शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वसंत मोरेंसाठी ४ पक्षांच्या १० नेत्यांनी टाकले गळ; एका शब्दामुळे वाढलं मनसेचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 11:58 AM

1 / 9
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारनं मशिदींवरील भोंगे उतरवावेत, अन्यथा त्यासमोर आम्ही लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका राज यांनी घेतली. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले.
2 / 9
मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखेत हनुमान चालिसा सुरू झाली. मात्र राज यांच्या भूमिकेमुळे पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं समजतं. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी आपली अडचण उघडपणे बोलून दाखवली.
3 / 9
माझ्यासोबत अनेक मुस्लिम बांधव आहेत. मुस्लिमबहुल विभागात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अडचण होत असल्याचं वसंत मोरे स्पष्टपणे बोलले. त्यानंतर त्यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली. ही जबाबदारी आता साईनाथ बाबर यांच्याकडे सोपवण्यात आली.
4 / 9
वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवलं जाताच अनेक प्रमुख पक्षांनी त्यांना आपल्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं. मात्र आपण अजूनही मनसैनिक असल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं. त्यांनी राज यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. मात्र राज यांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नाही.
5 / 9
वसंत मोरेंना अनेक पक्षातील मोठ्या नेत्यांनी संपर्क केला आहे. मात्र अद्याप तरी आपला पक्ष सोडण्याचा विचार नसल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं आहे. मोरेंनी अद्याप शब्द वापरल्यानं मनसेची चिंता वाढली आहे. राज यांनी याच आठवड्यात पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत भेटीसाठी बोलावलं होतं. मात्र मोरेंना निमंत्रण नव्हतं.
6 / 9
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मोरेंनी उघड नाराजी व्यक्त केली. ते थेट माध्यमांशी बोलले. त्यामुळेच राज यांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाल्याचं बोललं जातं. पुण्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावताना मोरेंना टाळून राज यांनी महत्त्वाचा संदेश दिल्याचं बोललं जात आहे.
7 / 9
२०१२ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत मनसेचे तब्बल २९ उमेदवार विजयी झाले. मात्र २०१७ मध्ये हाच आकडा थेट २ वर आला. भाजपच्या लाटेतही मोरेंनी विजय मिळवला. वैयक्तिक करिष्मा असलेले नेते अशी मोरेंची ओळख आहे. त्यामुळेच त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक पक्षांनी जोर लावला आहे.
8 / 9
शिवसेनेकडून वरुण सरदेसाईंनी मोरेंशी संपर्क साधला. याशिवाय सेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, तानाजी सावंत यांनीदेखील मोरेंशी संपर्क साधला आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते भाजपकडून प्रविण दरेकर यांनीही मोरेंशी संपर्क साधला आहे.
9 / 9
राष्ट्रवादी काँग्रेसनंदेखील मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, माजी महापौर दत्ता धनकवडे, अप्पा रेणुसे यांनी मोरेंशी संपर्क साधला आहे. तर काँग्रेसकडून मोहन जोशी अरविंद शिंदेंनी मोरेंशी संपर्क साधला आहे.
टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस