ही आहे 'वॉरिअर आजी'ला जगापुढे आणणारी 'अप्सरा'; व.पु. काळेंशी जवळचं नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 19:28 IST
1 / 17पुण्यातील हडपसरच्या आजी एका दिवसांत सोशल मीडियावरील सेंशशन बनल्या आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसतानादेखील त्यावर मात करत तरुणांना लाजवेल अशी थरारक 'कामगिरी'करत आहेत. 2 / 17 सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार, पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात.3 / 17या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज या आजीची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि एक लाखांची मदत आणि साडी-चोळीही भेट म्हणून दिली आहे.4 / 17 पुण्यातील हडपसर परिसरात या ८५ वर्षाच्या आजीबाई आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात काम केले. मात्र, आता ऊन , वारा, पाऊस एव्हाना कोरोनाकाळात देखील दोन वेळच्या अन्न पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोठी कसरत करावी लागत आहे5 / 17 सोशल मीडियावर त्यांचा एक काठी फिरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनीही त्यांचा हा काठी फिरवताना चा व्हिडिओ शेअर करत 'वॉरिअर आजी' असे त्याला कॅप्शन दिले.6 / 17अभिनेता सोनू सूदनेही या आजीच्या कसरती पाहिल्यानंतर आजीचा संपर्क पत्ता मागितला होता. आपल्याला या आजींना घेऊन महिलांसाठी स्व-संरक्षणाची शाळा सुरू करण्याचा विचार सोनूने मांडला. 7 / 17ऐश्वर्या काळे या तरुणीने वॉरियर आजीचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला. 8 / 17मुंबई, पुण्यासह देशातील विविध भागातून आजींबाईंसाठी मदत येऊ लागली, तर विदेशातूनही मदतीसाठी फोन आल्याचे ऐश्वर्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 9 / 17आपल्या नातवंडांच्या शिक्षणासाठी आजीबाई कसरती दाखवून उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, त्यांच्या या केलेला सोशल मीडियातून व्याप्ती मिळाल्यानंतर त्याची सर्वदूर दखल घेतली जात आहे.10 / 17 आजीबाईंना सर्वदूर पोहोचवणाऱ्या ऐश्वर्या काळे या प्रसिद्ध लेखक दिवंगत व.पु. काळे यांच्या नात आहेत. त्यांनी स्वत:ही आजीला मदत केली होती.11 / 17 झी युवा चॅनेलवरील अप्सरा आली या डान्स रिएलिटी शोच्या त्या रनरअप आहेत, त्यामुळे त्यांना मित्र-मैत्रिणींकडून अप्सरा आली.... असेही म्हटले जाते. 12 / 17 ऐश्वर्या काळे या व्यवसायनेही डान्सर आणि कोरिओग्राफर आहेत, पुण्यात नृत्यदिग्दर्शनाची त्यांची अकॅडमी आहे. 13 / 17 आजीबाईने मनात कोरोनाची भीती न बाळगता, रस्त्यावरच आपला लाठी-काठीचा खेळ सुरु केला. वयाच्या 85 व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. 14 / 17 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या उत्साहाचं आणि काठ्यांच्या कसरतीचं कौतुक केल. त्यावेळी, गृहमंत्र्यांनाही आजीने आपली कसरत दाखवली15 / 17 आजीबाईला येणाऱ्या मदतीचं श्रेयही आजीबाई ऐश्वर्या काळे यांनाच देतात, ऐश्वर्या ताईंमुळेच मी महाराष्ट्रात पोहोचल्याचं त्या सांगतात. 16 / 17ऐश्वर्या यांच्या प्रयत्नामुळे आजीबाईंची कला जगासमोर आली, शिवाय आजीला मोठी आर्थिक मदतही मिळाली.17 / 17आजीबाईंच्या कसरतींचं जेवढं कौतुक होतंय, तेवढचं कौतुक आजीबाईंची कला सोशल मीडियातून जगभर पसरविणाऱ्या ऐश्वर्या यांचही व्हायला पाहिजे, तेही होतंय.