By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 20:38 IST
1 / 8शिवणे व नांदेड सिटीच्या मधोमध मुठा नदीवर पूल आहे, त्या ठिकाणी रांजणखळगे पाहायला मिळत आहेत2 / 8खडकवासला धरणाच्या समोरील पात्रात शिवणे-नांदेड पुलालगत हे रांजणखळगे आहेत3 / 8पुलावरून नागरिक त्या खळग्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांत कचरा टाकतात त्यामुळे हे खळगे कचऱ्याने भरून गेले आहेत4 / 8विशेष म्हणजे जगप्रसिद्ध भुरूप आपल्या परिसरात आहे, याची माहितीच तेथील नागरिकांना नाही. त्यामुळे तेथून ये-जा करणारे या रांजणखळग्यात कचरा टाकत आहेत5 / 8प्रा. प्र. के. घाणेकर यांनी ‘सहली एक दिवसाच्या : पुण्याच्या परिसरात...’ या पुस्तकात निघोजच्या रांजणखळग्यांविषयी माहिती दिली आहे.6 / 8प्रा. प्र. के. घाणेकर यांनी ‘सहली एक दिवसाच्या : पुण्याच्या परिसरात...’ या पुस्तकात निघोजच्या रांजणखळग्यांविषयी माहिती दिली आहे.7 / 8त्यानुसार नदी पात्रात दुतर्फा काळ्या पाषाणात असंख्य रांजणखळगे दिसतात, त्याला शास्त्रीय भाषेत ‘पॉट होल्स’ म्हटले जाते.8 / 8या ठिकाणी नदीचा प्रवाह व्हेसिक्युलर किंवा स्कोरिएशियस बसाल्टचा वरचा थर आणि कॉम्पॅक्ट बसाल्टचा थर भेदून जातो. पाण्याच्या प्रवाहातील भोवरे-दगड-गोटे यामुळे नदीतळाच्या फत्तरावर खळगे तयार होतात. त्या खळग्यात अडकून दगडगोटे फिरू लागतात. आणखी झीज होऊन खळगे बनतात. त्याला रांजणाचा आकार येतो. हा निसर्गाविष्कार आवर्जून पाहण्यासारखा असतो. काही अभ्यासकांच्या मते आशिया खंडातील सर्वात मोठे रांजणखळगे हे निघोज येथील समजले जातात.