शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS | पुण्यात अवतरले तंटा सोडवणारे पंच अन् गावाला जागे करणारे वासुदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:21 AM

1 / 8
चावडीवर दोघा भावांतील तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा आणि बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक्कन जिमखान्याच्या 'बाशिम' गावात!
2 / 8
निमित्त होते मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे. या दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. २७) पुण्याच्या मध्यवर्ती भागात ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती अवतरली.
3 / 8
मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दीपूर्ती वर्षानिमित्त खास दोन दिवसांच्या ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे 'बाशिम' गाव साकारण्यात आले आहे.
4 / 8
मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
5 / 8
या बाशिम गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृतीचे सादरीकरण लक्षवेधी आहे.
6 / 8
बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलते.
7 / 8
मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, ‘शाळेत वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. त्या सगळ्याचे हे फलित या दोन दिवसात सादर करण्यात आले.
8 / 8
मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, ‘शाळेत वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. त्या सगळ्याचे हे फलित या दोन दिवसात सादर करण्यात आले.
टॅग्स :Puneपुणेdeccan gymkhanaडेक्कन जिमखाना