शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्ज काढून कार घेतली, लिफ्ट देऊन महिलांना लुटायचा! निवडणुकही लढवली, दत्तात्रय गाडेचे काळे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:41 IST

1 / 7
Swargate news today in marathi: नेहमी गजबज असलेल्या स्वारगेट बसस्थानक परिसरात एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ही घडली होती. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
2 / 7
तीन दिवसांपासून पोलिसांना चकवणाऱ्या नराधम दत्तात्रय गाडेला शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गुणाट गावाच्या शिवारात पकडले. एका उसाच्या शेतात गाडे लपून बसलेला होता. या बलात्कार प्रकरणामुळे दत्तात्रय गाडेने यापूर्वी केलेले गुन्हेही उजेडात आले आहेत.
3 / 7
चोरी, चेन स्नॅचिंग आणि इतर प्रकरणात दत्तात्रय गाडेवर अर्धा डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील एका प्रकरणात त्याला अटक झाली होती. २०१९ मध्ये तो जामिनावर बाहेर आला होता. शिरुर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून गाडेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली.
4 / 7
२०१९ मध्ये दत्तात्रय गाडे यांने कार कर्ज काढून कार विकत घेतली होती. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर तो कॅब चालवायचा. अंगावर दागिने असलेल्या आणि श्रीमंत दिसणाऱ्या महिलांना तो लिफ्ट द्यायचा आणि महामार्गावरच निर्जनस्थळी घेऊन जायचा. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने पैसे घ्यायचा. महिलांना तिथेच सोडून तो निघून जायचा.
5 / 7
यासंबंधात त्याच्याविरोधात पुणे आणि अहिल्यानगर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. शिरूरमधील कराडे घाटात २०२० मध्ये त्याने अशाच पद्धतीने लूट केली होती. त्याला सहा महिन्यांची शिक्षाही झाली होती. दत्तात्रय गाडेच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
6 / 7
दत्तात्रय गाडेने झटपट श्रीमंत होण्यासाठी दारूचा धंदा सुरू केला होता. त्यात यश आले नाही, तेव्हा त्याने कॅब चालवणे सुरू केले. दत्तात्रय गाडेने गुणाट गावात संघर्ष मुक्ती समितीची निवडणुकही लढवली होती. त्यात त्याचा पराभव झाला होता.
7 / 7
दत्तात्रय गाडेने ज्या तरुणीवर बलात्कार केला, तिला पोलीस असल्याचे सांगितले होते. तो सातत्याने या बसस्थानकात वावरायचा. त्यामुळे त्याने यापूर्वी अशाच पद्धतीने गुन्हेगारी कृत्ये केली आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
टॅग्स :Swargateस्वारगेटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhilyanagarअहिल्यानगर