Pune Fashion Street Market Fire: Check out these photos showing the awfulness of the fire
Pune Fashion Street Market Fire: पुण्यातील फॅशन स्ट्रीटवर अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारे हे १० फोटो पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 8:09 AM1 / 10मुंबईतील भांडूप येथील हॉस्पिटलला आग लागलेली ताजी असतानाच पुण्यात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग लागल्याची घटना घडली, या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. (फोटो सौजन्य - तन्मय ठोंबरे, लोकमत पुणे)2 / 10अत्यंत तोकड्या जागेत फॅशन स्ट्रीट मार्केट उभं राहिलं आहे, दाटवाटीचा परिसर असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यासाठी अनेक समस्या समोर आल्या. अनेक दुकाने जळून खाक झाली, अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या 3 / 10साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. 4 / 10पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे. अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. 5 / 10याठिकाणी आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. लोकमतशी बोलताना एक व्यापारी म्हणाले “आग लागल्यानंतर आम्ही लगेचच फायर ब्रिगेडला कळवले. मात्र जवळपास दीड तासाने फायर ब्रिगेड इथे दाखल झाले. त्यामुळे जास्त नुकसान झाले आहे, 6 / 10या ठिकाणी कोणती खाऊ गल्ली नाही. साधी चहाची टपरी देखील नाही. त्यामुळे इथे आग लागली तरी कशी हा प्रश्न आहे. आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे असे एका व्यापाऱ्यांनी सांगितले.7 / 10११ च्या सुमारास ही आग लागलेली असताना बघता बघता संपूर्ण मार्केट जळून खाक झाले, आगीचे गोळे आकाशात दूरवर दिसत होते, अंदाजे २००० च्या वर कपडे, चप्पल, गॉगलची दुकाने आहेत, काही मिनिटांतच संपूर्ण मार्केट जळून खाक झालं. 8 / 10२००० साली एम जी रोड वरील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी १ वर्षाच्या कालावधीपुरतं फॅशन स्ट्रीट (जुने कांबळे मैदान) याठिकानी जागा देण्यात आली होती. त्याचे आजतागायत नूतनीकरण झालेले नाही त्यावेळी व्यापाऱ्यांची संख्या ४०० होती, आज हीच संख्या २ हजाराहून अधिक झाली आहे. 9 / 10पार्किंगमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती, येथे अनेक व्यापारी संघटना अस्तित्वात आहे. आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली, आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर फायर ब्रिगेडच्या गाड्या थांबवल्या होत्या. 10 / 10२०१७ मध्ये मुंबईतील कमला मिल परिसरात आगीची दुर्घटना घडली होती, त्यानंतर पुणे येथील फॅशन स्ट्रीटचे कॅन्टोन्मेंट, पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपाने २०१८ साली संयुक्त रित्या फायर ऑडिट करत फॅशन मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications